JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Anushka sharma : दिवाळीच्या सणाला होळीच्या रंगात रंगली अनुष्का - विराटची लेक; वामिकाचे खास फोटो पाहाच

Anushka sharma : दिवाळीच्या सणाला होळीच्या रंगात रंगली अनुष्का - विराटची लेक; वामिकाचे खास फोटो पाहाच

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची मुलगी वामिकासाठी ही दिवाळी खूप खास होती, तिने या खास प्रसंगी होळी खेळायला सुरुवात केली. याची एक झलकही अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

जाहिरात

अनुष्का शर्मा-विराट कोहली

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**मुंबई, 25 ऑक्टोबर :**सध्या संपूर्ण देश दिवाळी साजरी करत आहे. सगळीकडे अगदी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दोन वर्षांनंतर धुमधडाक्यात दिवाळी साजरी केली जातेय. दिवाळीची धूम सर्वसामान्यांसोबतच बॉलिवूड स्टार्समध्येही पाहायला मिळाली. दररोज बॉलिवूड स्टार्स दिवाळी पार्टीमध्ये हजेरी लावताना दिसत आहेत. बॉलीवूड स्टार्सनी केवळ घरातच नव्हे तर ऑफिसमधील कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी उत्साहात साजरी केली. पण त्याचवेळी अनुष्का शर्माची दिवाळी या सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आणि खास होती. कारण त्यांच्या मुलीने यावेळी दिवाळी तर साजरी केलीच, पण होळीही खेळली. याची माहिती स्वतः अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे दिली आहे. अनुष्का शर्माच्या फोटोंमध्ये तिची लहान मुलगी वामिका रंगांशी खेळताना दिसली. अनुष्का आणि विराटची लेक वामिका सोशल मीडियावर कायमच चर्चेचा विषय ठरते. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. पण अनुष्काच्या लेकीचा चेहरा अजून चाहत्यांना पाहायला मिळालेला नाही. पण अनुष्का सोशल मीडियाद्वारे अधूनमधून वामिकाचे फोटो आणि अपडेट्स शेअर करत असते. त्याच्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करतात. आतासुद्धा अनुष्काने लेकीचा एक क्षण शेअर केला ज्याची सोशल मीडियावर चर्चा होतेय. हेही वाचा - Megha Ghadge Exclusive: ‘योगेशने मला अर्वाच्च भाषेत…; बिग बॉसमधून बाहेर पडताच मेघाचा योगेशवर गंभीर आरोप अनुष्का शर्माच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिची लहान मुलगी वामिका रंगांशी खेळताना रांगोळी काढताना दिसली. अशा परिस्थितीत, हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, “येथे दिवाळी आणि होळी एकाच दिवशी साजरी केली जात आहे.” याशिवाय अनुष्का शर्मानेही दिवाळी सेलिब्रेशनशी संबंधित फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती हिरव्या रंगाच्या साडीत पोज देताना दिसली होती. फोटोंमधील अनुष्का शर्माचा लूक आणि सौंदर्य पाहण्यासारखे होते. अनुष्का शर्माच्या या फोटोंवर सेलेब्सही भरपूर कमेंट करत आहेत.

अनुष्का शर्माच्या फोटोवर कमेंट करताना करण जोहरने लिहिले, “Gorgeous….” दिवाळीच्या फोटोंवर कमेंट करताना आकांक्षा रंजन कपूरने लिहिले, “स्टनिंग….” अभिनेत्रीच्या या फोटोंना आतापर्यंत 34 लाखांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे.

अनुष्काच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं तर वामिकाच्या जन्मानंतर आता ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. अनुष्का शर्मा लवकरच ‘चकडा एक्सप्रेस’ चित्रपटात दिसणार आहे. तिचा हा चित्रपट महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. या चित्रपटात अनुष्का केवळ अभिनेत्रीच नाही तर निर्माताही आहे. 2023 मध्ये 1 फेब्रुवारीला त्याचा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की हा चित्रपट OTT वर देखील प्रदर्शित होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या