मुंबई 9 जुलै: फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड (Pawankhind movie) अशा शिवराज अष्टकात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसलेला अंकित मोहन (Ankit Mohan) हा अभिनेता सध्या त्याच्या मुलासोबत रमलेला दिसून येतो. अंकित आणि त्याची बायको रुची यांना काही महिन्यापूर्वी मुलगा झाला होता सध्या रुआनचे बाबा रुआन सोबत मस्त वेळ घालवताना दिसत असतात. सध्या अंकितने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडिओ खूपच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्याला चाहत्यांकडून विशेष शुभेच्छा सुद्धा मिळत आहेत. या नव्या फोटोमध्ये अंकित रुआनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) मूर्तीला नमस्कार करायला शिकवताना दिसत आहे. तर त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रुआन महाराजांना मुजरा करत असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. शिवाजी महाराजांना मानणारे हजारो मावळे असल्याचं पाहायला मिळतं पण या चिमुकल्या गोड मावळ्याचा हा आगळा वेगळा मुजरा फारच लक्षवेधी ठरत आहे. अंकितने लहानपणापासूनच मुलावर केलेल्या या संस्कराचं खूप कौतुक होताना दिसत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत तो असं लिहितो, “छत्रपती शिवाजी महाराज की जय! महाराज आपला हा छोटा मावळा आज सात महिन्यांचा झाला. आपलं प्रेम आणि आपला आशीर्वाद असाच सदैव त्याच्या पाठीशी असुदे.” तसंच त्याच्या छोट्याश्या बाळाला प्रेम देणाऱ्या चाहत्यांचे सुद्धा तो आभार मानताना दिसत आहे. **हे ही वाचा-** Nava Gadi Nava Rajya : ‘राधिका मसाले’ची मालकीण आता दाखवणार वेगळा ठसका; अनिता दातेची नवी हटके मालिका “अंकित सध्या नवीन बाबा झाल्याचं फीलिंग एन्जॉय करताना दिसत आहे. तो कायमच रुआनसोबत घालवलेले अनेक क्षण चाहत्यांशी शेअर करताना दिसतो. सध्या त्याच्या या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एका युजरने “संस्कार खूप खूप छान करत आहात🚩😊” असं लिहिलं आहे तर दुसरा युजर “जय शिवराय अंकित दादा तू खुप उत्तम काम करत आहे आई भवानी आणि राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत राहील जय शिवराय❤️❤️❤️❤️” असं लिहिताना दिसत आहे.
अंकित हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्यांपैकी एक आहे हे त्याच्या अनेक पोस्टमधून पाहायला मिळतं. शिवाय दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील अगदी सगळ्याच चित्रपटात तो शिवरायांचा खंदा मावळा म्हणून पाहायला मिळाला आहे. अंकितच्या या कृत्याचं खूप कौतुक होताना दिसत आहे. अंकित रुआनसोबत अगदी व्यायाम करण्यापासून अनेक गोष्टी करताना दिसतो. त्याची ही नवी जबाबदारी तो उत्तम पेलताना दिसत आहे.