मुंबई 9 जुलै: आपल्या ठसकेदार नागपुरी ढंगात जिने तिच्या नवऱ्याला आणि नवऱ्याच्या बायकोला सुद्धा धडा शिकवला अशी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील (Radhika in mazya navryachi bayko) राधिका सुभेदार म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) आता झी मराठीवर नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. यात चक्क तिचं पात्रचं या जगात नाहीये पण तरीही ती एका खोडकर भूमिकेतून पुन्हा एंट्री घेत आहे. झी मराठीवर एका नव्या मालिकेची सुरुवात होणार असून ‘नवा गडी नवं राज्य’ (Nava Gadi Nava rajya new serial) असं त्या मालिकेचं नाव असणार आहे. या मालिकेत अनिता दाते सह कश्यप परुळेकर, (Pallavi Patil) पल्लवी पाटील, वर्षा दांदळे अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. घरावर राज्य असणाऱ्या एकीचा अर्धवट राहिलेला संसार पूर्ण करायला दुसऱ्या बायकोवर आलेलं राज्य म्हणून या मालिकेचं नाव ‘नवा गडी नवं राज्य’ आहे असं पाहायला मिळत आहे. या मालिकेतून एक आगळावेगळा विषय पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा नवाकोरा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. “जीव लावला की संसारातला प्रत्येक डाव जिंकता येतो…. त्या दोघींच्या संसाराची एक गोड गोष्ट….” अशी खास कॅप्शन या प्रोमोला देण्यात आली आहे. या प्रोमोमध्ये अनिताचं पात्र या जगात नसल्याचं दिसत आहे तर तिच्या पतीने दुसरं लग्न केल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. रमाच्या जाण्यानंतर तिचा संसार सावरायला आलेल्या आनंदीला मात्र घरातून फारसा सकारत्मक प्रतिसाद मिळत नसल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. हे ही वाचा- Shreya Bugde : ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्रीचं घर आहे एकदम टीपटॉप; PHOTO पाहून थक्क व्हाल! यात रमा आणि आनंदीमधला एक खोडकर संवाद दाखवला आहे. ज्यात रमा आनंदीला हे पटवून देत आहे की आज तिच्या जाण्यानंतर सुद्धा तिची जागा कोणीच घेऊ शकलेलं नाही तर दुसरीकडे आनंदी मात्र हा ठाम निश्चय करून आली आहे की सगळ्यांना आपलंस करून त्यांचं मन जिंकूनच दाखवेन. घरात आलेल्या या नव्या आनंदीचा स्वीकार आता वेगवेगळ्या नात्यांमध्ये होणार का? तिच्यावर आलेलं हे राज्य ती पेलू शकणार का? आणि रमा या सगळ्यात मोडता घालणार का मदत करणार हे पाहणं गंमतशीर ठरणार आहे. एकूणच अनिता दाते एरवीपेक्षा एका वेगळ्या भूमिकेत दिसून येणार आहे.
अनिताने या मालिकेशी संबंधित एक फोटो काही दिवसांपूर्वी शेअर केला होता ज्यात तिच्या फोटोला हार घातल्याचं दिसून येत होतं. यावर अनेकांना तिचं निधन झालं का अशी शंका आली होती आणि तिच्या फोटोवर अनेकांनी RIP असं लिहायला सुद्धा सुरुवात केली होती. मात्र तिच्या या खट्याळ पात्राचं प्रमोशन करण्यासाठी तिने ही शक्कल लढवल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे गुरुनाथला धडा शिकवणारी 300 करोडची मालकीण राधिका तर त्याहून एकदम विरुद्ध अशा काहीशा अतरंगी भूमिकेत अनिता दिसून येणार आहे. या प्रोमोनंतर तिच्या या अंदाजाचं खूप कौतुक होत आहे तसंच मालिकेबद्दल बरीच उत्सुकता सुद्धा पाहायला मिळत आहे.