JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Koffee With Karan : 65 व्या वर्षी फिट राहण्यासाठी अनिल कपूर करतात 'हे' काम; ऐकून बसेल मोठा झटका

Koffee With Karan : 65 व्या वर्षी फिट राहण्यासाठी अनिल कपूर करतात 'हे' काम; ऐकून बसेल मोठा झटका

नुकतेच आजोबा झालेले अनिल कपूर आजही फिटनेस मेंटेन करण्यासाठी करतात खास गोष्ट. व्हिडीओ होतोय व्हायरल

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 सप्टेंबर : बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेते अनिल कपूर मागचे काही महिने सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. ‘जुग जुग जिओ’ या सिनेमातून अनेक वर्षांनी अनिल कपूर सिनेमात दिसले.  नुकतेच अनिल कपूर आजोबा झालेत. वयाच्या 65व्या वर्षी देखील अनिल कपूर कमालीचे फिट आहेत. बॉलिवूडमधील फार कमी कलाकारांनी साठीनंतरही स्वत:ला फिट ठेवलं आहे त्यातील अनिल कपूर टॉप वनवर आहेत असं म्हणायला हरकत नाही. अनेक तरुणांना लाजवेल असा फिटनेस अनिल कपूर यांच्याकडे आहे. पण त्यांच्या या फिटनेसचं नेमकं रहस्य काय आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याचा खुलासा थेट अनिल यांनी करण जोहरच्या कॉफी विथ करण 7मध्ये केला आहे. कॉफी विथ करणमध्ये गेल्या अनेक सेलिब्रेटी हजेरी लावत आहेत. करणचे प्रश्न आणि त्यावर कलाकारांची भन्नाट उत्तर आणि त्यातून झालेली पोलखोल सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. या आठवड्याच्या कॉफी विथ करणच्या भागात अनिल कपूर आणि वरुण धवन स्पेशल गेस्ट असणार आहेत.  एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यात अनिल कपूर त्यांच्या चिरतरुण फिटनेसचं रहस्य सांगताना दिसत आहेत. हेही वाचा - Karan Johar on Nepotism : ‘मी स्टार किड्समध्ये टॅलेंट शोधतो पण…’; ब्रम्हास्त्रच्या रिलीजनंतर करण जोहरची खंत

संबंधित बातम्या

रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये करण अनिल यांच्याबरोबर रॅपिड फायर गेम खेळतो. त्यात प्रश्न विचारताना करण म्हणतो, ‘अशा कोणत्या तीन गोष्ट आहेत ज्यामुळे अनिल कपूर आजही स्वत:ला तरुण समजतात?’, या प्रश्नावर अजिबात वेळ न घालवता अनिल यांनी ‘सेक्स सेक्स सेक्स’, असं उत्तर दिलं. त्यांच्या या उत्तरानं वरुण आणि करणच्या भुवया उंचावल्या. आता इतकं बोल्ड उत्तर दिल्यानंतर अनिल कपूरनी थेट यूटर्न घेऊन हे सगळं स्क्रिप्टेट आहे असं म्हटलं.  सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनिल कपूर यांच्या वर्क फ्रंट विषयी सांगायचं झालं तर  अनिल कपूर नुकतेच जुग जुग जिओ या सिनेमात दिसले. वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात अनिल यांच्या त्यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री नीतू कपूर अनिल कपूरच्या बायकोची भूमिका साकारली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या