अमरीश पुरी फेमस डायलॉग
मुंबई, 22 जून : मनोरंजन क्षेत्रातील ट्रेंड सातत्यानं बदलत आहेत. आता डिजिटलच्या जमान्यात तर सिनेमातील डायलॉग गाणी काही क्षणात व्हायरल होऊन प्रेक्षकांच्या डोक्यात फिट होतात. पण बॉलिवूडमधील असे काही अभिनेते ज्यांचे डायलॉग हिट होण्यासाठी सोशल मीडियाची गरज भासली नाही. त्यांच्या अभिनयानं आणि डायलॉग फेकण्याच्या टायमिंगनं सर्वांची मनं जिंकली. असाच एक अभिनेता म्हणजे अमरीश पुरी. आपल्या दमदार अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकलीच पण त्यांचे डायलॉग अजरामर झाले. त्याचप्रमाणे त्यांचा दमदार आवाज आजही भल्याभल्यांच्या अंगावर काटा आणतो. आज अभिनेते अमरीश पुरी यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्तानं त्यांचे 10 दमदार फेमस डायलॉग कोणते आहेत पाहूयात. अमरीश पुरी यांचा जन्म 22 जून 1932साली पंजाबमध्ये झाला. 1967 ते 2005 या काळात त्यांनी जवळपास 450 हून अधिक सिनेमात काम केलं. अमरीश पुरी हे विनलच्या भुमिकेसाठी प्रामुख्याने ओळखले गेले. निगेटीव्ह भुमिकांमुळे त्यांना ओळख मिळाली. अमरीश पुरी यांची डायलॉग डिलिव्हरी इतकी जबरदस्त होती की त्यांच्या साध्या आवाजाने अंगावर काटे उभे राहत. त्यांची हिच खुबी त्यांची ओळख होती. अमरीश पुरी यांनी हिंदी सिनेमांबरोबर पंजाबी, तमिळ, कन्नड, मल्याळम सिनेमातही काम केलं आहे. हेही वाचा - रामायणच नाही दूरदर्शनवरील ‘या’ मालिकाही होत्या प्रसिद्ध; संपूर्ण कुटुंब एकत्र आवडीनं पाहायचं अमरीश पुरी यांचे फेमस डायलॉग