JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची फसवणूक? ट्विट करून दिली महत्त्वाची माहिती

दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची फसवणूक? ट्विट करून दिली महत्त्वाची माहिती

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत.

जाहिरात

अमिताभ बच्चन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी ब्लू टिक आता फ्रीमध्ये मिळणार नाही असं जाहीर केल्यानंतर 20 एप्रिलपासून फुकटात मिळणाऱ्यांची ब्लू टिक काढण्यात आली. यामध्ये अनेक कलाकार, राजकीय नेते यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र आता बॉलिवडचे सुपरस्टार दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केलेल्या एक ट्विटने खळबळ उडाली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटमध्ये एक आरोप केला आहे. ज्यांचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत त्यांना फ्रीमध्ये ब्लू टिक मिळालं आहे. अमिताभ बच्चन यांचे 48.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. तरी देखील त्यांच्याकडून पैसे घेऊन ब्लू टिक दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी ट्विट करून केला आहे.

संबंधित बातम्या

ट्विटरने फ्री ब्लू टिक 20 एप्रिलपासून बंद करणार असून तुम्हाला पैसे भरावे लागतील असं सांगण्यात आलं होतं. ज्यांनी पैसे भरले त्यांना ब्लू टिक पुन्हा मिळालं. मात्र काहींचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि ज्यांनी पैसे भरले नाहीत अशा युजर्सच्या नावासमोरचं ब्लू टिक अजूनही तसंच असून ते फुकटात लाभ घेत असल्याचं लक्षात आणून दिलं आहे.

अमिताभना गुन्हेगार ठरवून सर्वांनी सोडलेली साथ, संपलेलं करिअर; ‘या’ व्यक्तीने दिला हात,पुन्हा बनले सुपरस्टार
जाहिरात

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. तुमचे पैसे आता परत मिळणार नाहीत. तुम्हालाला एलन मस्क यांनी फसवलं आहे असंही एका युजरने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

Amitabh Bachchan :‘हमार नाम के आगे उ वापस लगाय…’ ब्लु टिक हटवताच बिग बींनी ट्विटरची भोजपुरी स्टाईलमध्ये घेतली फिरकी

ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, दरमहा महिन्याला 650 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. युजर्सना वर्षाचं सब्स्क्रिप्शन करायचं झाल्यास, त्यांना 6,800 रुपयांचा प्लॅन देखील खरेदी करू शकतात. त्याच वेळी, Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी 900 रुपये प्रति महिना योजना आहे. Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी 9,400 रुपये भरावे लागणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या