JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / दिवाळीच्या आदल्यादिवशी अमिताभ बच्चन यांना मोठी दुखापत, KBC च्या सेटवर घडली घटना

दिवाळीच्या आदल्यादिवशी अमिताभ बच्चन यांना मोठी दुखापत, KBC च्या सेटवर घडली घटना

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक अपघात घडला असल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात

अमिताभ बच्चन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 ऑक्टोबर : बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक अपघात घडला असल्याचं समोर आलं आहे. अमिताभ यांच्या पायाची नस कापली गेली, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. अमिताभ यांनी ब्लॉगवर अपघाताची माहिती शेअर केली आणि सांगितले की रक्त थांबवण्यासाठी काही टाके देखील लावले आहेत. ही बातमी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बातमी समोर आल्यापासून अमिताभ यांचे चाहतेही चिंतेत आहेत. अमिताभ लवकर ठीक व्हावेत अशी प्रार्थना करत आहेत. रविवारी KBC च्या पुढच्या एपिसोडचे शूटिंग करत असताना त्यांचा अपघात झाला. अमिताभ यांचा पाय कापला गेला. अभिनेत्याच्या पायाच्या मागची नस कापली गेली. त्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांना त्यांच्या पायाला टाके घालावे लागले. डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. हेही वाचा -  ‘तिला माझ्याकडून फक्त प्रेम’ तुरुंगातून पत्र लिहत सुकेशने जॅकलिनबाबत केला मोठा खुलासा अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले की, “धातुच्या धारदार तुकड्याने डावा पाय कापला आणि नस कापली गेली. नस कापली की रक्त अनियंत्रित होते. मात्र कर्मचारी आणि डॉक्टरांच्या टीमने वेळीच केलेल्या मदतीमुळे तो आटोक्यात आला असून पायाला टाके पडले आहेत. ते लवकरच बरे होऊन पुन्हा शूटिंगला सुरुवात करतील.

दरम्यान, 11 ऑक्टोबरला अमिताभ यांनी त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा केल्याची माहिती आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी KBC या शोमध्ये एक खास एपिसोड ठेवण्यात आला होता. या एपिसोडमध्ये अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन देखील दिसले होते. यावेळी अमिताभ खूप भावनिक झालेले पहायला मिळाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या