मुंबई, 23 जुलै : विंबल्डन 2019 मध्ये क्वॉर्टर फायनलपर्यंत मजल मारणारी प्रसिद्ध टेनिसस्टार एलिसन रिस्क स्पर्धा संपताच लग्नाच्या बेडीत अडकली. तिनं प्रसिद्ध टेनिसपटू आणि डेविस कपसाठी भारतीय टीमचे कॅप्टन राहिलेले आनंद अमृतराज यांचा मुलगा स्टीफन अमृतराज याच्याशी लग्न केलं. मागच्या काही वर्षांपासून हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते मात्र त्यांनी आता अधिकृतरित्या लग्न केलं आहे. पण हे लग्न गाजलं ते एलिसनच्या डान्समुळे. तिनं तिच्याच लग्नात एका बॉलिवूड गाण्यावर अगदी देसी स्टाइलमध्ये ठुमके लगावत जबरदस्त डान्स परफॉर्मन्स दिला. एलिसाचा डान्स पाहून सानिया मिर्झा झाली अवाक् भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा सुद्धा या अमेरिकन टेनिसस्टारचा बॉलिवूड गाण्यावरील धम्माल डान्स पाहून अवाक् झाली. नव्या जोडप्याला शुभेच्छा देताना सानियानं लिहिलं, ‘हे ठुमके कमाल आहेत.’
सुपरस्टारला किस करायला नकार देणं आणि होकार देणंही 2 अभिनेत्रींना असं पडलं महाग एलिसानं लग्नातील बॉलिवूड गाण्यावरील हा डान्स व्हिडिओ शेअर करताना लिहिलं, आता अधिकृतरित्या मी अमृतराज झाले. मी खूप नशीबवान आहे की मला स्टीफन अमृतराज सारखा नवरा मिळाला. माझे सर्व नवे भारतीय फॉलोअर्स कुठे आहेत. मी थोडा बॉलिवूडकर बनण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुमची मनं जिंकण्याचाही.
Bigg Boss Marathi 2 : विणा आणि शिवच्या नात्यात येणार का दुरावा? एलिसानं ‘बार-बार देखो’ या सिनेमातील गाणं ‘नचले सारे बन ठन के’ या गाण्यावर डान्स केला. तिच्यासोबत तिच्या कुटुंबीयांनी सुद्धा या गाण्यावर एकत्र ठेका धरला. हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेक भारतीय या अमेरिकन टेनिसपटूचे चाहते झाले आहेत. मूळचा भारतीय असलेल्या स्टीफनसोबत लग्न केल्यानं तिला भारतात पोहोचणं सोपं झालं आहे. Sacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा जागतिक क्रमवारीत 37 व्या क्रमांकावर आहे एलिसन 29 वर्षीय एलिसन रिस्क जागतिक क्रमावारीत 37 व्या क्रमांकावर आहे. तिला अमेरिकेची उगवती टेनिसपटू असं मानलं जातं. नुकतीच ती विंबल्डनच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली होती. याबाबत बोलताना ती म्हणाली, मी थोडा आणखी आक्रमक खेळ करायला हवा होता. मला आशा वाटते की, मी पुढच्यावेळी आणखी चांगली कामगिरी करेन. ================================================================ दोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल