JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'हा तर रणबीरच्या संगतीचा परिणाम' बॉडीगार्डशी उद्धट वागल्यानं आलिया झाली ट्रोल

'हा तर रणबीरच्या संगतीचा परिणाम' बॉडीगार्डशी उद्धट वागल्यानं आलिया झाली ट्रोल

आलियाचा बॉडीगार्डशी उद्धट वर्तन केल्याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 सप्टेंबर : अभिनेत्री आलिया भट नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतेच. कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी रणबीर कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे आलिया चर्चेचा विषय ठरते. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे आलिया ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. आपल्या बॉडीगार्डशी उद्धट वर्तन केल्यानं आलिया आता लाइमलाइटमध्ये आली आहे.  आलियाचा हा व्हिडीओ फोटो जर्नलिस्ट विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आलिया कारमधून उतरताना दिसत आहे. ती उतरल्यावर फोटोग्राफर्स तिचे फोटो क्लिक करण्यासाठी पुढे येतात. गाडीतून उतरल्यावर तिचा बॉडीगार्ड गर्दीपासून वाचण्यासाठी पुढे निघून जातो मात्र हे पाहिल्यावर आलिया चालता चालता थांबते बॉडीगार्डला पुढे जायला सांगते. आलिया म्हणते, तुम्ही पुढे जा… चल तुम्ही पुढे. यावेळी आलियाच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसत होती. ती चांगल्या मूडमध्ये नसल्याचं लक्षात येत होतं. सोनाली कुलकर्णीच्या ‘विक्की वेलिंगकर’ला तुम्ही भेटलात का?

आलियाचा हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. या व्हिडीओ युजर्सच्या वेगवेगळ्या कमेंट पाहायला मिळत आहेत. सोशल मीडिया युजर्सना आलियाचं बॉडीगार्डशी अशाप्रकारे उद्धट वागलेलं आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे लोकांनी तिला तिचं वागणं बदलण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी आलियाच्या अशा वागण्याचं खापर रणबीरच्या संगतीवर फोडलं आहे. हिमेश रेशमियानंतर बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध गायकानं दिली रानू यांना गाण्याची ऑफर ‘हा सर्व रणबीरच्या संगतीचा परिणाम आहे.‘असं अनेकांचं म्हणणं आहे. तो सुद्धा अशाच प्रकारे मीडिया किंवा फॅन्ससोबत उद्धटपणे किंवा तुटकपणे वागतो. एका युजरनं लिहिलं, हे कॅमेरासमोर खूप चांगले वागतात आणि बाहेर मात्र आपल्या बॉडीगार्ड किंवा चाहत्यांशी अशाप्रकारे उद्धट वर्तन करतात. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं अशा वागण्याचा काय अर्थ तो तुझा बॉडीगार्ड आहे त्याचा तू आदर करायला हवा. सर्वांचा आदर करण्याचा दिखावा फक्त कॅमेरासमोर करू नका असा सल्ला बऱ्याच युजर्सनी दिला आहे. रानू मंडल यांनी लतादीदींच्या सल्ल्यानंतरही गायलं त्याचं गाजलेलं गाणं ============================================================ बापरे! गाणं गाता गाताच गेला त्यांचा जीव, पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या