मुंबई, 1 जानेवारी- बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपलपैकी आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) यांचे कपल आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर रणबीर आणि आलिया सार्वजनिक ठिकाणी देखील एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात.नुकतच हे बॉलिवूडचं क्यूट कपल मुंबई विमानतळावर दिसलं. आज नवीन वर्षानिमित्त आलियाने तिच्या बनीसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो पाहून नक्की रणबीरचा लुक कुणासोबत मिळता जुळता आहे हे लक्षात येईल. आलियाने रणबीरसोबत काही क्यू़ट फोटो शेअर करत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहे. पहिल्या फोटोत आलिया चेहऱ्यावर स्माईल दिसत आहे. तिची ही स्माईल कुठे तरी ये जवानी है दीवानीमधील दीपिका पादुकोण म्हणजे नैना तलवारच्या लुकशी मिळती जुळती आहे. तर दुसरा फोटो रणबीरचा आहे. रणबीरचा लुक तर फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जातो. तोही ये जवानी हे दीवानीमधील बनीच्या लुकशी मिळता जुळता आहे. यासोबतच तिनं सिंहाचे देखील फोटो शेअर केले आहेत. तिनं ठिकाणाचा उल्लेख केला नसला तरी. हे क्यूट कपल निर्सागाच्या सानिध्यात नवीन वर्ष साजरं करत असल्याचे दिसत आहे. काही दिवसापूर्वीच क्यूट कपल मुंबई विमानतळावर दिसल होते. बॉलिवूडमधील अनेक क्यूट कपल सध्या न्यू इअर सेलिब्रेशनसाठी परदेशात गेले आहेत.
रणबीर आणि आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, दोघे पहिल्यांदाचं आयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, डिंपल कपाडिया आणि नागार्जुन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. वाचा- सोनमने पती आनंदसोबत LIPLOCK करत केलं New Year सेलिब्रेशन आलिया सध्या तिच्या आरआरआर या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनासीठी तिनं अनेक शोमध्ये हजेरी लावली आहे. त्याचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. ‘RRR’मध्ये सुपरस्टार राम चरण रामचरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr NTR) मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात आलिया भट्टही (Alia Bhatt) महत्त्वाच्या भूमिकेत असून, ती सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात तिच्यी भूमिका लहान असली तरी तितकीच महत्त्वपूर्ण आहे.