JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Alia Bhatt: आलिया भट्टच्या आजोबांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; एयरपोर्टवरुन परतली अभिनेत्री

Alia Bhatt: आलिया भट्टच्या आजोबांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; एयरपोर्टवरुन परतली अभिनेत्री

Alia Bhatt Grandfather Health:सोनी राजदान यांचे वडील आणि आलिया भट्टचे आजोबा नरेंद्र राजदान यांची प्रकृती खालावली आहे.

जाहिरात

आलिया भट्टच्या आजोबांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 मे- आलिया भट्टला बॉलिवूडमधील नवी लेडी सुपरस्टार म्हणून संबोधलं जात आहे. आलियाने बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. विदेशातसुद्धा आलियाचा मोठा चाहतावर्ग आहे. दरम्यान अभिनेत्री सतत विदेशी इव्हेंट्समध्ये दिसून येते. दरम्यान आलिया भट्ट आयफा 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी अबुधाबीला जाणार होती. मात्र आता तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अभिनेत्रीने तिचं आगामी सर्व शेड्युल रद्द केलं आहे. माहितीनुसार, आलिया भट्टचे आजोबा नरेंद्र राजदान यांची प्रकृती खालावली आहे. आजोबांना गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये दाखल केल्यामुळे आलियाने अबुधाबीचा दौरा रद्द केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टचे आजोबा नरेंद्र राजदान यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माहितीनुसार, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना यापूर्वीही याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विविध प्रकारच्या संसर्गामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नरेंद्र राजदान हे सोनी राजदान यांचे वडील आणि आलियाचे आजोबा आहेत. (हे वाचा: Karisma Kapoor: इतक्या वर्षानंतर एक्स पतीसोबत दिसली करिश्मा कपूर; का घेतलेला घटस्फोट? ) सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने यासंदर्भात एक पोस्ट शेअर करत ही बातमी आलियाच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दुसरीकडे, टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आलिया भट्टला एयरपोर्टवर पोहोचताच ही बातमी मिळाली, त्यानंतर तिने आयफामध्ये सहभागी होण्याचा विचार बदलला आणि आपला प्लॅन रद्द केला आणि थेट हॉस्पिटलसाठी रवाना झाली. आलिया आपल्या आजोबांच्या फारच जवळ आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘नरेंद्र राजदान हे सोनी राजदानचे वडील आणि आलियाचे आजोबा आहेत. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे. सकाळी डॉक्टरांनी आलियाच्या कुटुंबियांना फोन केला की, आजोबांना आयसीयूमध्ये हलवायचं आहे. पण कुटुंबीयांनी त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यास नकार दिला आणि खोलीतच सर्व व्यवस्था करण्यास सांगण्यात आली. त्यांचं वय तब्बल 95 वर्षे आहे. रिपोर्ट्सनुसार, आलियाला तिच्या आजोबांसोबत राहायचं असल्यानं तिने अचानक अबुधाबी दौरा रद्द करत आलिया एयरपोर्टवरुन माघार घेतली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या