JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आलिया भट्ट ठरली सर्वात महागडी अभिनेत्री, व्हॅल्यू सेलिब्रेटी लिस्टमध्ये केलं टॉप, जाणून घ्या 2021 ची कमाई

आलिया भट्ट ठरली सर्वात महागडी अभिनेत्री, व्हॅल्यू सेलिब्रेटी लिस्टमध्ये केलं टॉप, जाणून घ्या 2021 ची कमाई

नुकतंच 2021 चा सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट (Celebrity Brand Valuation Report) समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये डफ अँड फेल्प्सने व्हॅल्यू सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 मार्च-   बॉलिवूड   (Bollywood)  कलाकरांमध्ये सतत स्पर्धा सुरु असते. यामध्ये कोण वरचढ ठरतं हे  पाहणं औत्सुक्याचं ठरतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रेक्षक व्हॅल्यूएशन सेलिब्रेटी कोण ठरलं हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. नुकतंच 2021 चा सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट   (Celebrity Brand Valuation Report)  समोर  आला आहे. या रिपोर्टमध्ये  डफ अँड फेल्प्सने व्हॅल्यू सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत टॉप 10 मध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, अक्षय कुमार आणि दीपिका पादुकोण या भारतीय सेलिब्रिटींचा  समावेश आहे. ही यादी डफ अँड फेल्प्सने ‘सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन स्टडी, 2021’ च्या ‘डिजिटल एक्सलेरेशन 2.0’ या नावाने आपल्या 7 व्या आवृत्तीत प्रसिद्ध केली आहे. रिपोर्टनुसार, आलिया भट्ट ही 2021 मधील सर्वात महागडी सेलिब्रिटी आहे. तिचं व्हॅल्युएशन अंदाजे  68.1 मिलियन असल्याचं म्हटलं जात आहे. डफ अँड फेल्प्स सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशनच्या रिपोर्टनुसार, आलिया भट्ट 2021 मध्ये सर्वात महागडी महिला सेलिब्रिटी म्हणून समोर आली आहे. 68.1 मिलियन व्हॅल्युएशनसह, आलिया भट्ट   (Alia Bhatt)  चक्क चौथ्या क्रमांकावर आहे आणि भारतीय अभिनेत्रींच्या यादीत  अव्वल स्थानावर आहे. मागील यादीच्या तुलनेत आलियाने दोन क्रमांकांची वाढ केली आहे. आलिया ही बॉलिवूडची सर्वात व्यस्त अभिनेत्री आहे आणि अनेक ब्रँड एंडोर्समेंटमुळे ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे.

2020सेलिब्रेटी ब्रँड व्हॅल्यूएशन रिपोर्टमध्ये आलिया भट सहाव्या स्थानावर होती. मात्र ता 68.1 मिलियन डॉलरसह चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची ‘गंगुबाई  काठियावाडी’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. तिच्या अभिनयच प्रचंड कौतुक झालं होतं. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आरआरआर’मध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेत आहे. शाहरुख खानचं  2020 च्या अहवालात 51.1 मिलियन डॉलर इतकं ब्रँड व्हॅल्युएशन  होतं, ते 2021 च्या रिपोर्टमध्ये टॉपच्या यादीत कुठेही दिसलं नाही. मात्र, 51.6 मिलियन डॉलरसह सलमान खान आठव्या स्थानावर आहे. 2020 च्या रिपोर्टमध्ये नवव्या क्रमांकावर असलेले अमिताभ बच्चन यांच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. त्यांचं  ब्रँड व्हॅल्युएशन सध्या  54.2 मिलियन डॉलरसह सहाव्या स्थानावर आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या