मुंबई, 12 सप्टेंबर : प्रचंड ट्रोलिंग नंतर आलिया आणि रणबीर कपूरचा ‘ब्रम्हास्त्र’ हा सिनेमा रिलीज झाला. अनेक महिने सिनेमाची चर्चा सुरू होती. सिनेमातील केसरीया तेरा या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकुळ घातला मात्र सिनेमा फ्लॉप ठरेल अशा अनेक शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. ब्रम्हास्त्र देखील बायकॉट बॉलिवूडचा शिकार होईल असं म्हटलं जात होतं पण प्रत्यक्षात मात्र ब्रम्हास्त्रला बायकॉट बॉलिवूडची कोणतीच झळ बसलेली पाहायला मिळालेली नाही. सिनेमा रिलीजच्या तिसऱ्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. सिनेमानं ओपनिंग विकेंडमध्ये दमदार यश मिळवलं आहे. आलिया भट्ट आणि रणवीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला ब्रम्हास्त्र हा सिनेमा 9 सप्टेंबरला रिलीज झाला. सिनेमा ओपनिंग विकेंडला सगळ्या भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. विकेंडला सिनेमानं एकूण 122.58 करोडची कमाई केली आहे. सिनेमानं पहिल्या दिवशी भारतात 37 करोडची कमाई केली. इतक्या ट्रोलिंगनंतर सिनेमानं ही केलेली ही बंपर कमाई पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचवाल्या. तर दुसऱ्या दिवशी सिनेमानं 42 करोडचं कलेक्शन केलं. तिसऱ्या दिवशी ही कमाई वाढली तब्बल 44.80 करोडचा गल्ला सिनेमानं जमावला. हेही वाचा - Brahmastra: ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये दीपिका पादुकोण बनणार रणबीरची आई? ‘या’ सीनवरून मिळाली मोठी हिंट
बॉयकॉट ट्रेंड, निगेटिव्ह रिव्ह्यूजचा ब्रम्हास्त्र सिनेमावर कोणताही परिणाम झाल्याचं दिसून येत नाहीये. देशभरात सिनेमाचे शो हाऊसफुल्ल आहेत. भुलभुलैया 2 या सिनेमानंतर रिलीज झालेले सगळे बॉलिवूड सिनेमे जोरदार आपटले. लाल सिंह चड्ढा, रक्षाबंधन, लाइगर सारख्या सिनेमानंतर आता ब्रम्हास्त्र चांगली कमाई करत असल्याचं दिसत आहे. ओपनिंग विकेंडला 100 करोडचा बिझनेस करणारा ब्रम्हास्त्र हा सातवा सिनेमा ठरला आहे. तर 100 कोटींची कमाई करणारा अभिनेता रणबीर कपूरचा दुसरा सिनेमा आहे. आलिया आणि रणबीर ही ऑफस्क्रिन जोडी पहिल्यांदा ऑनस्क्रिन पहायला मिळाल्यानं प्रेक्षाकांनी देखील उत्साह दाखवला आहे. तर दुसरीकडे ब्रम्हास्त्रच्या ग्लोबल कमाईकडे पाहायचं झालं तर ब्रम्हास्त्रचं ग्लोबल ओपनिंग कलेक्शन हे 210 करोड इतकं आहे.