JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Twinkle Khanna: शिक्षणाला वय नसतं! 48 व्या वर्षी लंडनमध्ये 'या' विषयाचं शिक्षण घेतेय अक्षय कुमारची बायको

Twinkle Khanna: शिक्षणाला वय नसतं! 48 व्या वर्षी लंडनमध्ये 'या' विषयाचं शिक्षण घेतेय अक्षय कुमारची बायको

अभिनेत्री-लेखिका बनलेली ट्विंकल खन्ना वयाच्या 48 व्या वर्षी शिक्षणासाठी लंडनला गेली आहे. नक्की काय शिक्षण घेतेय ती जाणून घ्या.

जाहिरात

ट्विंकल खन्ना

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जून :  अभिनेत्री-लेखिका बनलेली ट्विंकल खन्ना सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी कायम चर्चेत असते. ही अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील घडामोडी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सुपरस्टार वडिलांची मुलगी असली तरी ट्विंकल खन्ना बॉलिवूडमध्ये यशस्वी होऊ शकली नाही. अक्षय कुमारसोबत लग्न होताच तिने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आणि संसार सांभाळू लागली. पण त्यानंतर तिने लेखिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता वयाच्या  48 व्या वर्षी ट्विंकल खन्ना शिक्षणासाठी लंडनला गेली आहे. नक्की काय शिक्षण घेतेय ती जाणून घ्या. ट्विंकल खन्ना  सध्या लंडन विद्यापीठातील प्रसिद्ध गोल्डस्मिथमध्ये फिक्शन रायटिंगमध्ये मास्टर्स करत आहे. तिने तिच्या महाविद्यालयीन जीवनाची एक झलक शेअर केली आहे. वयाच्या 48 व्या वर्षी शिक्षण घेताना तिला काय अनुभव येत आहे, ती कशी शिकत आहे याचा अनुभव तिने शेअर केला आहे. अशी एखादी गोष्ट आहे का जी वयामुळे साध्य होत नाही, असा प्रश्न नेटकऱ्यांना तिने विचारला आहे. इंस्टाग्रामवर एक छोटा  व्हिडिओमध्ये तिने कॉलेजमध्ये जाताना, मित्र मैत्रिणींसोबत कॉफी घेताना आणि कॉलेजचे धमाल करत असतानाचा अनुभ शेअर केला आहे. ती तिच्या कॉलेजच्या इमारतीसमोर पोज देताना दिसत आहे ज्याच्या भिंतीवर ‘गोल्डस्मिथ्स’ लिहिलेले आहे.

इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना ट्विंकल खन्नाने लिहिले की, ‘तुमची पन्नाशी उलटल्यावर शिक्षणासाठी विद्यापीठात परत जाण्यासारखे काय आहे? बरं, मला इथे क्लासेस करून आता नऊ महिने झाले आहेत आणि मी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. सबमिशन, ग्रेड आणि कॉफीच्या हजार मग द्वारे मी स्वतःला असे पाहीन हे कोणाला माहीत होतं? काहीवेळा मला असे वाटते की मी लेखन कसं करायचं हे शिकण्याऐवजी मी जीवनातील विविध भन्नाट पर्याय अशा विषयात  मास्टर्स करायला पाहिजे होतं.’ Ranbir Kapoor: प्री-टीझर रिलीज होताच रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ वादात; त्या चित्रपटाचा सीन कॉपी केल्याचा आरोप तिने पुढे म्हटलंय की, ‘पण दुसरीकडे, मला हे सर्व नवे अनुभव असतील आणि एक मित्रांची गॅंग ज्यांच्यावर मी विश्वास ठेवू शकते की ते मला डेडलाइनमधून बाहेर निघायला मदत करतील लंच ब्रेकमध्ये मला हसवतील. ‘रापलेली त्वचा, कमी झालेलं वजन आणि ऊर्जा- एकत्र तुम्ही गमावलेल्या गोष्टींना धरून बसू शकता नाहीतर तुम्ही त्याबदल्यात काय मिळवलंय ते पाहू शकता. म्हातारे होणे हे गणितीय समीकरण आहे; वजाबाकी म्हणून पाहण्यापेक्षा मी त्याला गुणाकार बेरीज मानेन.’ अशा भावना ट्विंकल खन्नाने व्यक्त केल्या आहेत.

संबंधित बातम्या

ट्विंकलला सध्या चाहते या कोर्ससाठी कौतुक करत तिला शुभेच्छा देत आहेत. ट्विंकलच्या या पोस्टवरून ती लंडनमध्ये लेखनाशी संबंधित कोर्स करतेय असं दिसत आहे. ट्विंकलचा नवरा सुपस्टार अक्षय कुमारही अधूनमधून लंडनला जातो आणि तिच्यासोबत वेळ घालवतो. त्याच्यासोबत त्याची मुलं आरव आणि निताराही आहेत. अक्षय आता OMG 2 मध्ये यामी गौतम आणि पंकज त्रिपाठीसोबत दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या