अक्षय कुमार
मुंबई, 07 एप्रिल: अभिनेता अक्षय कुमार त्याच्या अभिनयाबरोबरच फिटनेससाठीही ओळखला जातो. तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तो त्याचे, तसेच कुटुंबाबरोबरचे फोटो व व्हिडिओ त्याच्या अकाउंटला शेअर करत असतो. अक्षयची फॅन फॉलोइंग खूप आहे. तब्बल 64 मिलियन लोक त्याला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात, पण अक्षय स्वतः मात्र फक्त सहा अकाउंट्स फॉलो करतो. ही सहा अकाउंट्स कोणाची आहेत, या यादीत कोणत्या व्यक्तींच्या अकाउंट्सचा समावेश आहे, ते जाणून घेऊयात. या संदर्भात ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिलं आहे. ट्विंकल खन्ना अक्षय कुमार त्याची पत्नी ट्विंकल खन्नाला इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. दोघेही त्यांच्या ‘इंटरनॅशनल खिलाडी’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 17 जानेवारी 2001 रोजी त्यांनी लग्न केलं होतं. त्यांना आरव आणि नितारा नावाची दोन मुलं आहेत. ट्विक इंडिया अक्षय कुमार इन्स्टाग्रामवर फॉलो करत असलेल्या सहा प्रोफाईलपैकी एक ट्विक इंडिया आहे. ट्विक इंडिया ही महिलांना केंद्रस्थानी ठेवून सुरू करण्यात आलेली डिजिटल कंटेंट कंपनी आहे, ज्याची स्थापना त्याची पत्नी ट्विंकल खन्नाने केली आहे. Salman Khan: ‘तुमचे मुलंदेखील तेच….’ ओटीटी प्लॅटफॉर्म विषयी सलमान खानने केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड अक्षय कुमार फिटनेस फ्रिक आहे. तो इन्स्टाग्रामवर माजी क्रीडामंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांना फॉलो करतो. राठोर हे ऑलिम्पिक पदक विजेते, माजी नेमबाज आणि भारतीय सैन्यातील निवृत्त अधिकारी आहेत. 2018 मध्ये अक्षय आणि कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड फिटनेसवर चर्चा करण्यासाठी एकत्र इन्स्टाग्रामवर लाइव्ह आले होते. फोर्स IX अक्षय कुमार इन्स्टाग्रामवर त्याने अलीकडेच लाँच केलेल्या फॅशन लेबल Force IX ला फॉलो करतो. त्याने नोव्हेंबर 2022 मध्ये मनीष मानधनासोबत हा कपड्याचा ब्रँड लाँच केला होता. पॅड मॅन द फिल्म अक्षय कुमार त्याच्या 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘पॅड मॅन’ चित्रपटाच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजला फॉलो करतो. ट्विंकल खन्नाची सहनिर्मिती असलेल्या आणि आर. बाल्की दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयने पॅड मॅन अरुणाचलम मुरुगनंतम यांची भूमिका साकारली होती आणि मासिक पाळीतील स्वच्छतेच्या विषयाबद्दल भाष्य केलं होतं.
ग्रेझिंग गोट पिक्चर्स ग्रेझिंग गोट पिक्चर्स हे अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दी यांचं प्रॉडक्शन हाउस आहे. ते त्यांनी 2011 मध्ये सुरू केलं होतं. ‘ओ माय गॉड!’, ‘फग्ली’ आणि ‘सिंग इज ब्लिंग’ सारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती कंपनीने केली आहे. पण या प्रॉडक्शन हाउसचं इन्स्टाग्राम हँडल 2016 पासून अॅक्टिव्ह नाही.