रविना टंडन अक्षय कुमार
मुंबई, 08 मे: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार नेहमीच चर्चेत असतो. आज तो ट्विंकल खन्ना सोबत सुखी संसार करत असला तरी त्याआधी त्याचं नाव खूप जणींसोबत जोडलं गेलं आहे. अक्षयने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींना डेट केलं आहे. ज्यामध्ये रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टी यांचा समावेश होतो. पण एकदा लग्न झाल्यानंतर मात्र तो या अभिनेत्रींसोबत पुन्हा कधीच दिसला नाही. आता मात्र ब्रेकअपनंतर एवढ्या वर्षांनी अक्षय पहिल्यांदाच आपल्या एक्स गर्लफ्रेंड सोबत दिसला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दोघांच्या चेहऱ्यावर दिसणार्या हास्यावरून हे स्पष्ट होते की दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत. या दोन्ही स्टार्सला बऱ्याच दिवसांनी एकत्र बघून चाहतेही खूप खूश आहेत.आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अवॉर्ड शोमध्ये अक्षय कुमारला ‘स्टाईल हॉल ऑफ फेम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रवीना टंडनने स्वतः तिच्या एक्स बॉयफ्रेंडला स्वतःच्या हातांनी हा पुरस्कार दिला. एवढंच नाही तर रवीनाने अक्षयचे जोरदार कौतुक देखील केले. यादरम्यान दोघांच्या चेहऱ्यावर सुंदर स्मित पाहायला मिळाले.
बॉलिवूडमध्ये एके काळी रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्या प्रेमाच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. दोघांनाही लग्न करायचे होते. ‘मोहरा’ चित्रपटाच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांचीही एंगेजमेंट झाली होती. पण त्यांचे लग्न होऊ शकले नाही आणि त्यांचे ब्रेकअप झाले. अक्षयने तिचा विश्वासघात केल्याचं अभिनेत्री म्हणाली होती. रवीना टंडन तो प्रसंग कधीच विसरली नाही. अक्षयने केलेल्या विश्वासघाताबद्दल ती अनेकदा बोलताना दिसली. स्वतःच्या भावालाच मानसिक रोगी म्हणून घरात डांबून ठेवायचा आमिर खान? अभिनेत्याने केले होते गंभीर आरोप घटस्फोट किंवा ब्रेकअपनंतर लोक आयुष्यात पुढे जातात, पण रवीनाने अनेकदा अक्षयबद्दल आपली व्यथा सर्वांसमोर मांडून फसवणूक केल्याचा आरोप केला होता. ब्रेकअपनंतर दोघेही कोणत्याही चित्रपटात दिसले नाहीत किंवा फंक्शनमध्येही कधी एकत्र दिसले नाहीत. आता ब्रेकअपनंतर एवढ्या वर्षांनी पहिल्यांदाच हे दोघे एकत्र आले आहेत.
55 वर्षांच्या अक्षयने अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत लग्न केले आहे. तो दोन मुलांचा बाबा आहे. तर 48 वर्षीय रवीनाने बिझनेसमन अनिल थडानीसोबत लग्न केले आहे. रवीनाही दोन मुलांची आई आहे. हे दोघेही आता आपापल्या संसारात सुखी आहेत.