मुंबई, 6 मार्च- पावनखिंड ( pawankhind) हा चित्रपट सध्या सगळीकडं गाजत आहे. यातील प्रत्येत कलाकरांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. या सगळ्याचं श्रेय श्रेय दिग्पाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आहे. या सगळ्यात एक नाव मात्र सगळ्यांच्य तोडांत आहे. ते म्हणजे सिनेमात बाजीप्रभूंची भूमिका साकरणारे अभिनेते अजय पूरकर ( ajay purkar ) यांचे होय. यांच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अजय पूरकर यांनी सिनेमात बाजीप्रभू देशपांडे ( bajiprabhu deshpande) यांची ऐतिहासिक भूमिका साकारली आहे. अजय पूरकर कधी नायक तर कधी खलनायक म्हणून तर कधी एक गायक म्हणून आपली कारकीर्द उभी केली आहे. त्यांच्यातील अभिनय आणि गायन या कलांचा मिलाप आपल्याला अनेक कलाकृतींतूनही दिसून आला. नांदी हे त्यातील एक महत्वाचं नाव होय. कलाकारांची मांदियाळी असलेल्या या नाटकात अजय यांनी आपल्या दोन्ही कलांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि कौतुकाची थाप मिळवली. वाचा- अरुंधतीच्या नवीन घराशी संजनाचं खास कनेक्शन; नेटकऱ्यांना ओळखला फरक अजय यांच्या कोड मंत्र या नाटकाने एकाच वर्षात तब्बल 24 पुरस्कार मिळवले होते. अजय यांनी नाटकांसोबतच मालिका आणि चित्रपट क्षेत्रात देखील अभिनयाचा ठसा उमठवला आहे. त्यांनी मराठी सोबतच त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. यात ऐतिहासिक मालिकांचा ही समावेश आहे.बालगंधर्व, प्रेमाची गोष्ट, कदाचित, फेरारी की सवारी, रिस्पेक्ट, फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड ही यातील काही नावं आहेत.
अजय यांनी पावनखिंड सिनेमात साकारलेल्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेचे सर्वांकडून कौतुक होत आहे. त्यांनी यापूर्वी विविध मुलाखतींतून बाजीप्रभू देशपांडे यांची व्यक्तिरेखा साकारणं हे त्यांचं स्वप्न असल्याचे सांगितलं आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांत ते हे स्वप्न जगले आहेत हे नक्की आणि आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाने हे स्वप्न पूर्णत्वास गेलं आहे. या काळात त्यांनी केलेली अपार मेहनत या सिनेमातून दिसते. त्यांची आधीच लोकप्रिय ठरलेली कारकीर्द या चित्रपटामुळे एका नवीन उंचीवर जाऊन पोहोचली आहे.