मुंबई, 7 सप्टेंबर- जगभरातून लोक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. तब्बल दोन वर्षानंतर भक्तांना बाप्पाच्या दर्शनासाठी दारं खुली झाली आहेत. दरम्यान अनेक बॉलिवूड कलाकारांनीही लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. नुकतंच अभिनेत्री काजोल दर्शनासाठी पोहोचली होती. त्यानंतर आता अभिनेत्रीचा पती आणि अभिनेता अजय देवगणसुद्धा आपल्या लेकासोबत बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचला होता. हा व्हिडीओ सध्या मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या सेलिब्रेटीं व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान योगेश शाह या प्रसिद्ध पापाराझीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर अजय देवगणचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेता अजय देवगण आपला मुलं युगसोबत बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अजय देवगण अतिशय शांत आणि आत्मविश्वासाने पुढे पुढे जात आहे. तर दुसरीकडे अभिनेत्याचा मुलगा युग थोडासा अस्वस्थ दिसून येत आहे. कदाचित तो गर्दी पाहून भयभयीत झाल्याचा अंदाज लावला जात आहे. युग देवगण सार्वजनिक ठिकाणी फारच दिसून येतो. परंतु अजय आणि काजोल आपल्या मुलाचे आणि मुलीचे फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असतात.
(हे वाचा: Pooja Sawant : पूजाला मिळाला पुण्यातील प्रसिद्ध गणपतीच्या आरतीचा मान; पाहा व्हिडीओ **)** तसेच व्हायरल व्हिडीओ अजय आणि युग पारंपरिक अंदाजात दिसून आले आहेत. यावेळी अजय देवगणने गडद निळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता. तर दुसरीकडे युगने पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता. दोघेही बापलेक पारंपरिक अंदाजात बाप्पाचं दर्शन घेताना दिसून आले. युग फारच कमी वेळा कॅमेऱ्यात कैद होतो. परंतु तरीसुद्धा इतर स्टारकिड्सप्रमाणे तोसुद्धा प्रचंड चर्चेत असतो.