JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'ही' दाक्षिणात्य अभिनेत्री करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पर्सनल लाईफमुळे आहे अधिक चर्चेत

'ही' दाक्षिणात्य अभिनेत्री करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पर्सनल लाईफमुळे आहे अधिक चर्चेत

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत(Aishwarya Rajinikanth) ही साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि गायिका आहे. साऊथ इंडस्ट्रीनंतर ऐश्वर्या आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये रंगली आहे.

जाहिरात

Aishwarya Rajinikanth

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 मार्च: सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत(Aishwarya Rajinikanth) ही साउथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि गायिका आहे. साउथ इंडस्ट्रीनंतर ऐश्वर्या आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. ती निर्माता मीनू अरोरासोबत ओ साथी चल नावाचा चित्रपट घेऊन येत आहे. ऐश्वर्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे जो खऱ्या प्रेमकथेवर आधारित आहे जो काही वर्षांपूर्वी मीडियामध्ये खूप चर्चेत होता. बी टाऊनमध्ये ऐश्वर्यासंर्भात रंगलेल्या या चर्चेला अभिनेत्रीने स्वतः दुजोरा दिला आहे. एका वेबसाईटशी बोलताना ऐश्वार्याने बॉलिवूडमधील एन्ट्रीसंदर्भात भाष्य केले. मात्र, तिने अधिक माहिती देण्यास टाळले. तसेच स्क्रिप्टिंगची प्रक्रिया सुरु असुन मुख्य कलाकारांची माहिती गुलदस्त्यात असल्याचे म्हटले आहे. पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत काही दिवसांपूर्वी, दाक्षिणात्य स्टार अभिनेता, दिग्दर्शक धनुषच्या घटस्फोटाच्या चर्चेमुळे ऐश्वर्या चर्चेत राहिली होती. धनुष आणि ऐश्वर्याने 18 वर्षांच्या संसारानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विभक्त होण्याची बातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली होती.दोघां चा मार्ग वेगळां पण मुलांसाठी एकत्र ऐश्वर्या आणि धनुष भले वेगळे झाले असतील, पण दोघे मिळून मुलांचे संगोपन करत आहेत. दोघांनीही ठरवलंय की एकजण कामात व्यस्त असतो तेव्हा दुसऱ्याने मुलांसोबत असायचं. अलीकडेच, जेव्हा ऐश्वर्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा मुलं पुन्हा धनुषसोबत होती जिथे तो शूटिंग करत होता. धनुष आणि ऐश्वर्या हे प्रयत्न करत आहेत की दोघेही पती-पत्नी म्हणून वेगळे झाले असतील, पण ते पालक म्हणून एकत्र राहतील आणि मुलांची पूर्ण काळजी घेतील. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या अतरंगी रे या चित्रपटात धनुष शेवटचा दिसला होता. या चित्रपटात धनुषसोबत अक्षय कुमार आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत होते. सध्या धनुषचे अनेक तमिळ चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या