JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Tejashree Pradhan: सासूने सुनेला दिली फक्कड मेजवानी, शुभ्रा-असावरी पुन्हा एकत्र

Tejashree Pradhan: सासूने सुनेला दिली फक्कड मेजवानी, शुभ्रा-असावरी पुन्हा एकत्र

छोट्या पडद्यावर ज्याप्रमाणे अनेक मराठी मालिका लोकप्रिय ठरल्या आहेत, त्याचप्रमाणे ऑनस्क्रीन सासू-सुनांच्या जोड्यासुद्धा हिट झाल्या आहेत. यातीलच एक जोडी म्हणजे शुभ्रा आणि असावरी होय. या जोडीने घराघरात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. ही सासू-सुनेची जोडी ‘अग्गबाई सासूबाई’ या लोकप्रिय मालिकेत झळकली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,21 जुलै-   छोट्या पडद्यावर ज्याप्रमाणे अनेक मराठी मालिका लोकप्रिय ठरल्या आहेत, त्याचप्रमाणे ऑनस्क्रीन सासू-सुनांच्या जोड्यासुद्धा हिट झाल्या आहेत. यातीलच एक जोडी म्हणजे शुभ्रा आणि असावरी होय. या जोडीने घराघरात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. ही सासू-सुनेची जोडी ‘अग्गबाई सासूबाई’ या लोकप्रिय मालिकेत झळकली होती. मालिका बंद होऊन आता बरेच दिवस झाले, मात्र आजही चाहते या दोघींना प्रचंड मिस करतात. दरम्यान या दोघी पुन्हा एकदा एकत्र दिसून आल्या. तेजश्री प्रधान आणि निवेदिता सराफ या दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते आपल्या पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दररोजच्या अपडेट्स देत असतात. अशातच आता तेजश्री प्रधानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. कारणही तितकंच खास आहे. या फोटोमध्ये तेजश्री निवेदिता सराफ यांच्यासोबत दिसून येत आहे. अर्थातच या ऑनस्क्रीन सासू-सुनेची जोडी पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहून त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. तेजश्री आणि निवेदिता यांनी नुकतंच एकमेकांची भेट घेतली एकमेकींसोबत सुंदर वेळ घालवला विशेष म्हणजे निवेदिता यांनी तेजश्रीसाठी खास पदार्थही बनवले होते. तेजश्रीने न चुकता त्यांच्या स्वयंपाकाचं कौतुक केलं आहे. अर्थातच तेजश्री त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेली होती.

संबंधित बातम्या

(हे वाचा: Subodh Bhave: सुबोध भावेने सेलिब्रेट केला मुलाचा बर्थडे; केकची थीम होती फारच हटके **)** मराठीमध्ये नेहमीच सुंदर सुंदर मालिका पाहायला मिळतात. ‘अग्गबाई सासूबाई’ हीदेखील अशीच एक मालिका होती. नेहमी खाष्ट सासू आणि अन्याय सहन करणारी सून, किंवा सासूला न पटवून घेणारी सून अशा कथा आपण अनेक मालिकांमधून पाहिल्या आहेत. मात्र या सर्व मालिकांना छेद देत या मालिकेने मात्र अनोखी कथा समोर मांडली. एखाद्या मायलेकीप्रमाणे राहणाऱ्या सासू-सून यामधून सर्वांनाच पाहता आल्या. झी मराठीवरील या लोकप्रिय मालिकेत सासूची भूमिका प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी साकारली होती. तर त्यांच्या लाडक्या सुनेची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या