नवी दिल्ली, 15 एप्रिल : काश्मिरी पंडितांची शोकांतिका दाखवणाऱ्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आपल्या चित्रपटाच्या यशानंतर विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी ‘द दिल्ली फाइल्स’ (The Delhi Files) नावाचा चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती. आजपासून त्यांनी या चित्रपटावर काम सुरू केलं आहे. ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये पुष्करनाथ बनून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) देखील अग्निहोत्रीच्या या नव्या चित्रपटाचा एक भाग असणार आहेत. अनुपम खेर यांनी काही काळापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना सोशल मीडियावर सांगितलं होतं की, या चित्रपटाचा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं अभिनंदन करताना, अनुपम खेर म्हणाले, “‘द दिल्ली फाइल्स’साठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की, चित्रपट निर्माते म्हणून तुम्हीही या इतिहासाच्या चुकीच्या पद्धतीने समोर आणलेल्या पानाला न्याय द्याल. त्याचा एक भाग होण्यासाठी उत्सुक आहे.’ #RightToLife. या ट्विटसोबत अनुपम खेर यांनीही या चित्रपटाचं पोस्टर शेअर केले आहे.
अनुपम खेर ने ‘द दिल्ली फाइल्स’ के लिए बधाई दी है.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर करताना लिहिलं की, ‘ज्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला आपलं म्हणून स्वीकारलं त्या सर्वांचे मी आभार मानतो. गेली 4 वर्षे आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे आणि शिस्तीने मेहनत घेतली. कदाचित मी तुमची टाइमलाइन बदलत आहे, परंतु लोकांना काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार आणि हत्यांबद्दल माहिती असणे महत्त्वाचे आहे. आता माझ्या नवीन चित्रपटावर काम सुरू करण्याची वेळ आली आहे.
विवेक अग्निहोत्री इससे पहले ‘द ताशकंद फाइल्स’ भी बना चुके हैं.
‘द काश्मीर फाइल्स’मध्ये अनुपम खेर यांनी या चित्रपटात पुष्करनाथची भूमिका साकारली होती, जे काश्मिरी पंडित होते. अनुपम खेर यांच्या व्यक्तिरेखेचे खूप कौतुक झाले. ‘द कश्मीर फाइल्स’ने प्रभासच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘राधे श्याम’ या चित्रपटासोबतच बॉक्स ऑफिसवर प्रवेश केला. पण ‘द काश्मीर फाईल्स’ला लोकांकडून एवढा यशस्वी प्रतिसाद मिळेल, असा कोणीही विचार केला नसेल. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे.