मुंबई, 31 मार्च : मागच्या वर्षी आलेल्या उरी द सर्जिकल स्ट्राइक सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या विकी कौशलनंही आता कोरोना व्हायरसच्या लढ्यात रुग्णांना मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांच्या पावलावर पाऊल ठेवत विकीनंही PM Cares फंडमध्ये मोठी रक्कम दान केली आहे. सध्या कोरोनाग्रस्तांसाठी अनेक बॉलिवूड स्टार्सनी मदतीचा हात दिला आहे. ज्यापैकी काहींनी त्यांनी दान केलेली रक्कम सांगितली आहे तर काहींनी मात्र ही रक्कम गुप्त ठेवणं पसंत केलं आहे. विकी कौशलनं PM Cares फंडमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी 1 कोटी रुपये दान केले आहेत. विकीनं त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यानं लिहिलं, मी खूप भाग्यवान आहे की, आज मी माझ्या कुटुंबासोबत घरी बसलो आहे. मात्र काही लोक आजच्या या परिस्थितीतही घरी राहू शकत नाहीत. या कठीण काळात मी PM Cares फंड आणि महाराष्ट्र चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये 1 कोटी रुपयांची रक्कम दान करत आहे. आम्ही आज एकमेकांच्या सोबत आहोत आणि असेच एकत्र मिळून सर्वजण यातून बाहेर पडू. देशाचं भविष्य स्वस्थ आणि ताकदवान बनवण्यासाठी प्रयत्न करूया. काजोल आणि न्यासाला कोरोना झाल्याच्या चर्चा, अजय देवगणनं ट्विटरवरून सांगितलं सत्य
बॉलिवूडमधील अनेक कलाकार सध्या कोरोना व्हायरसच्या या लढ्यात मदतीचा हात देताना दिसत आहेत. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा विदेशात राहूनही PM Cares फंडमध्ये डोनेशन द्यायला विसरलेली नाही. याशिवाय तिनं अनेक संस्थामध्ये दान केलं आहे. मात्र प्रियांकानं किती रक्कम दान केली हे मात्र सांगितलेलं नाही. तसेच तिनं तुम्हाला जमेल तशी मदत करा. तुम्ही किती पैसे देता हे महत्त्वाचं नाही तर तुम्ही कशी मदत करत आहात हे महत्त्वाचं आहे असं आवाहन केलं आहे. स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर वर्षभरातच घेणार घटस्फोट? Lockdown : दूरदर्शनवर सुरू झाले जुने शो, सनी लिओनीनं केलं हटके स्वागत