JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Dilip Joshi: अमिताभ-धर्मेंद्र नंतर दिलीप जोशींच्या घराबाहेर बंदुका अन बॉम्ब घेऊन पोहचले 25 जण; पोलिसांनी जारी केला अलर्ट

Dilip Joshi: अमिताभ-धर्मेंद्र नंतर दिलीप जोशींच्या घराबाहेर बंदुका अन बॉम्ब घेऊन पोहचले 25 जण; पोलिसांनी जारी केला अलर्ट

अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे घर उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम दिलीप जोशी यांच्या घरी 25 सशस्त्र लोक पोहोचले आहेत.

जाहिरात

दिलीप जोशी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 मार्च नुकतीच अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे घर उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर सगळी सुरक्षा यंत्रणा सावध झाली होती. पण त्यानंतर आता पुन्हा मोठी बातमी समोर आली आहे. एका लोकप्रिय अभिनेत्याच्या घराबाहेर काही सशस्त्र लोकांनी धाड टाकली आहे, त्यामुळे खळबळ माजली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम दिलीप जोशी यांच्या घरी   25 सशस्त्र लोक पोहोचले आहेत. ही माहिती एका व्यक्तीने नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून दिली. ही बातमी समोर आल्यानंतर नागपूर पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. दिलीप जोशी यांच्या घराबाहेर 25 लोक बंदुका आणि बॉम्ब घेऊन उभे असल्याचे त्या व्यक्तीने फोनवरून पोलिसांना सांगितले. ही बातमी समोर आल्यानंतर नागपूर पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. वृत्तानुसार, 1 फेब्रुवारी रोजी एका अज्ञात व्यक्तीने नागपूर नियंत्रण कक्षाला फोन केला. Sushmita Sen : सुष्मिता सेनला हार्ट अटॅक; अभिनेत्रीने हेल्थ अपडेट सांगत केला मोठा खुलासा यादरम्यान, त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम करणारे अभिनेते दिलीप जोशी यांच्या घराबाहेर बंदूक आणि बॉम्बसह 25 लोक उभे होते. यासोबतच या व्यक्तीने अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि मुकेश अंबानी यांचे घर बॉम्बने उडवल्याची चर्चा होती. असेही सांगितले आहे. फोन करणार्‍याने सांगितले की, हे 25 लोक अशा कारवाया करण्यासाठी मुंबईत पोहोचले आहेत. त्या व्यक्तीच्या कॉलनंतर नागपूर नियंत्रण कक्षाने शिवाजी पार्क पोलिस स्टेशनला अलर्ट जारी केला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

या व्यक्तीने विशेष अॅपच्या मदतीने नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांना ज्या नंबरवरून कॉल आला तो नंबर दिल्लीतील एका सिमकार्ड कंपनीत काम करणाऱ्या मुलाचा होता. कॉलरने एका स्पेशल अॅपच्या मदतीने मुलाचा नंबर फसवला होता. पोलिसांनी अज्ञात फोन करणार्‍यावर गुन्हा दाखल केला असून सध्या त्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे घर उडवण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या मंगळवारी एका अज्ञात व्यक्तीने नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि मुकेश अंबानी यांची घरे उडवून देण्याची धमकी दिल्याची बातमी आली होती. या खुलाशानंतर, पोलिसांनी कारवाई केली आणि मुकेश अंबानींच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना Z+ सुरक्षा दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या