'छपरी' डायलॉग वादावर लेखकानं उचललं मोठं पाऊल
मुंबई, 14 जून- प्रभास आणि क्रिती सनॉन स्टारर आदिपुरुष हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात दाखल झाला आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून सतत कोणत्या कोणत्या कारणामुळं चर्चेत आहे. या चित्रपटातील संवादावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या चित्रपटाच्या मीम्सची लाट तर आलीच आहे, शिवाय अनेकांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. सोशल मिडियावर तर चक्क या चित्रपटाच्या डायलॉगला छपरी म्हटलं गेलं आहे. ‘कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, तो जलेगी भी तेरे बाप की..’’ असा संवाद ऐकल्यानंतर तर प्रेक्षक भडकलेच.मात्र हा एकच नव्हे तर असे अनेक संवादांवर आक्षेप घेण्यात आला आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर कडाडून टिका करण्यात आली आहे. असे छपरी संवाद चित्रपटातुन काढून टाकण्यात यावेत अशा मागणीनं सोशल मीडियावर सध्या जोर धरला आहे. या चर्चेदरम्यान आता चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटातील न आवडलेले आणि टिका होत असलेले संवाद काढून टाकण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. वाचा- वडिलांपेक्षाही यशस्वी झाले हे स्टारकिड्स; हिट चित्रपट देऊन गाजवलं घराण्याचं नाव मनोज यांनी ट्विट केले आहे की, रामकथेतून पहिला धडा शिकता येतो तो म्हणजे प्रत्येकाच्या भावनेचा आदर करणं. बरोबर की चूक, काळ बदलतो पण भावना तशीच राहते. मी आदिपुरुष मध्ये 4000 हून अधिक ओळींचे संवाद लिहिले, 5 संवादाने लोकांच्या काही भावना दुखावल्या. त्या शेकडो ओळींमध्ये जिथे श्रीरामाचा महिमा होता, माता सीतेच्या पावित्र्याचं वर्णनही होते, त्यांची स्तुतीही व्हायला हवी होती, जी मला का मिळाली नाही हेच कळत नाही.
तसेच ते पुढे म्हणतात की, ‘माझ्यासाठी तुझ्या भावनांपेक्षा दुसरं काहीही महत्वाच नाही. मी माझ्या संवादांच्या बाजूने अगणित युक्तिवाद देऊ शकतो, परंतु यामुळे तुमचं दुःख कमी होणार नाही. मी आणि चित्रपटाच्या निर्माते-दिग्दर्शक यांनी ठरवलं आहे की, जे काही संवाद तुम्हाला दुखावत आहेत, आम्ही त्यांचा शोध घेऊ आणि या आठवड्यात ते चित्रपटात समाविष्ट करू. श्री राम तुम्हा सर्वांचे कल्याण करो’..असं म्हणत त्यांनी वादग्रस्त संवाद बदलण्य़ाचा निर्णय घेतला आहे.
आदिपुरुष सिनेमातल्या रावण, हनुमान, प्रभू राम यांच्या वेशभुषेची तसंच VFX ची खिल्लीही लोकांनी उडवली. सिनेमात दाखवण्यात आलेली रावणाची लंका सोन्याची नाही तर काळ्या दगडाची वाटते असंही लोकांनी मह्टलं आहे. तसंच सोशल मीडियावर लोक या सिनेमातले संवाद छपरी असल्याचं म्हणत आहेत. एकूण काय हा सिनेमा चांगला नाही असं सांगण्यासाठी छपरी या शब्दाचा वापर नेटकरी सातत्याने करत आहेत.