Deepika Padukone
मुंबई, 22 ऑक्टोबर: अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने (Deepika Padukone News) आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील तिच्य अभिनयाची छाप सोडली आहे. आता ग्लोबल फ्रंटवर आणखी एक जबाबदारी सांभाळताना ही बॉलिवूड अभिनेत्री दिसणार आहे. स्पोर्ट्सवेअर रिटेलर एडिडासने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची ग्लोबल ब्रँड अॅम्बेसिडर (Deepika Padukone Appointed as ADIDAS Global Brand Ambassador) म्हणून नियुक्ती केली आहे. आता जगभरात Adidas women प्रोडक्ट प्रमोट करताना दीपिका दिसणार आहे. कंपनीने म्हटले आहे की या निर्णयामुळे महिला खरेदीदारांमध्ये एक मजबूत ब्रँड तयार होईल. कंपनीने या निर्णयाबाबत सकारात्मक आहे. दीपिकाची काय होती प्रतिक्रिया? दीपिका पादुकोणने यावेळी अशी प्रतिक्रिया दिली की, एक अॅथलीट असल्याने आणि एक खेळ खेळल्याने मला आज जी व्यक्ती मी आहे ती बनण्यास मदत झाली. यामुळे मला अशी मूल्ये शिकवली आहेत जी जीवनातील इतर कोणत्याही अनुभवात शिकता येत नाहीत. तसेच ती म्हणाली की आज फिटनेस, फिजिकल आणि भावनिकता हे माझ्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहेत. दीपिका एडिडासची ग्लोबल ब्रँड अॅम्बेसिडर बनल्यानंतर ती भारतातील एडिडासशी संबंधित महिला ब्रँड अॅम्बेसिडरच्या दिग्गजांच्या यादीत समाविष्ट झाली झाले. यात वेटलिफ्टर मीराबाई चानू, बॉक्सर लवलिना बोर्गोहेन, निखत जरीन आणि सिमरनजीत कौर, धावपटू हिमा दास आणि स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकल यांचा समावेश आहे. वाचा- वयाच्या 12 व्या वर्षापासून Crypto मध्ये गुंतवणूक; 18 व्या वर्षी झाला कोट्यवधी कोरोना काळात जीवनशैली बदलली आहे. स्पोर्ट्सवेअर आणि कॅज्युअल अॅपरल किरकोळ विक्रेत्यांना या साथीच्या आजारानंतर फायदा झाला. या काळात ग्राहकांनी कॅज्युअल पोशाख आणि औपचारिक पोशाखांपासून स्वत:ला दूर करत स्वेटपँट, टी-शर्ट परिधान करण्याला पसंती दिली. त्यामुळे अशाप्रकारच्या बदलाला चालनाच मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाचा- नवोदित कलाकारांसाठी संधी; ‘आई कुठे काय करते’च्या अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची मुलगी दीपिका हिनेही राष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेळला आहे. ADIDAS India चे वरिष्ठ संचालक सुनील गुप्ता म्हणाले, ग्लोबल यूथ आयकॉन आणि मानसिक आरोग्य तसंच वैयक्तिक कल्याणाला प्राधान्य देणारी व्यक्ती म्हणून दीपिका क्रीडा आणि मुव्हमेंटद्वारे सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या ब्रँडच्या महत्त्वाकांक्षेनुसार याठिकाणी फिट बसते आहे.