Tujhech Mi Geet Gaat Ahe: मालिकेत नवा ट्विस्ट; अभिनेत्री उर्मिला कोठारेनं का घेतली मालिकेमधून एक्झिट?
मुंबई, 01 जून: स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली मालिका म्हणजे ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Meet Gaat Ahe) या मालिकेच्या निमित्ताने नागपूरी तडका असलेली मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) उर्मिला कोठारे (Urmila Kothare) प्रिया मराठी (Priya Marathe) या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. मालिकेतील दोन छोट्या कलाकारांनाही सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. परंतु मालिकेतून अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने एक्झिट घेतली आहे. मालिका वेगळ्या वळणावर असताना उर्मिलाने मालिका मध्येच का सोडली असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. (urmila kanitkar kothare exit from Tujhech Mi Geet Gaat Ahe Serial) अभिनेत्री उर्मिला कोठारे मालिकेत मल्हारची बायको आणि स्वराची आईचं वैदेहीचं पात्र साकारत होती. मालिकेतील वैदेही या पात्राचा लवकरच मृत्यू होणार आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकानुसार, अभिनेत्री उर्मिला आता मालिकेतून एक्झिट घेणार आहे. मालिकेत वैदेहीला कँन्सर झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. तिच्या उपचारांसाठी कोणीही पैसे द्यायला तयार नाही. वैदेहीची मुलगी म्हणजे स्वरा आपल्या आईच्या उपचारांसाठी पैशांची मदत मागताना दिसत आहे. मात्र तिच्या प्रयत्नांना अपयश येणार असून वैदेहीचा मृत्यू होणार आहे. मालिकेचा एक प्रोमो समोर आला असून यात वैदेहीचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. हेही वाचा - सगळ्यांची झालीय बत्ती गुल, पालवीच्या प्रेमात पडलीय पब्लिक फुल! ‘टाईमपास 3’च्या टिझरला 24 तासात 1M व्ह्यूज स्वरा तिच्या घरी येते तेव्हा तिला दारात गर्दी दिसते. ती आईला म्हणजेच वैदेही हाक मारते. तिच्या मामाला ‘आई कुठे गेली?’ असं विचारते. तेव्हा मामा तिला ‘तुझी आई देवाघरी गेली’, असं सांगतो. हे ऐकून स्वराला धक्का बसतो आणि दारात ठेवलेल्या आईच्या पार्थिवावरची चादर बाजूला करते. आपली आई खरंच देवाघरी गेल्याचं स्वराला कळत आणि ती मोठ्याने रडू लागते.
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत आलेल्या या नव्या ट्विटमुळे मालिकेत नव्या वळणाची सुरुवात होणार आहे. आईचं छत्र हरवल्यानं आता स्वराचं पुढे काय होणार हा एकच प्रश्न मालिकेचा प्रोमो पाहून पडतो आहे. मामी आधीपासूनच स्वराचा राग राग करत असते. मामा जरी चांगला असला तरी त्याचं मामीच्या पुढ्यात काही चालत नाही. त्यामुळे आता स्वराकडे कोण बघणार? स्वराचं पुढे काय होणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. अभिनेत्री उर्मिला कोठारेने देखील 12 वर्षांनी टेलिव्हिजनवर काम करण्यास सुरुवात केली होती. तिच्या छोट्या पडद्यावरील आगमनाने तिचे चाहते देखील खुश होते. परंतू एका महिन्यातच उर्मिलाची मालिकेतून एक्झिट झाल्याने तिचे चाहते देखील नाराज झाले आहेत.