मुंबई, 3 मे : बॉलिवूड अभिनेता इरफान खानचं 29 एप्रिलला निधन झालं. आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण करणाऱ्या इरफानच्या जाण्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांना त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशात आता मराठी अभिनेत्री मिथिला पालकर हिनं इरफान खानसाठी गाणं गात त्याला श्रद्धांजली दिली आहे. इरफानच्या ‘कारवा’ या सिनेमात मिथिला दिसली होती. मिथिलाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मिथिला पालकरनं इरफान खानसोबत 2018 मध्ये आलेल्या ‘कारवां’ या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात या दोघांची हटके केमिस्ट्री पाहायला मिळाली होती, ज्याने प्रेक्षकांना हसवलं आणि इमोशनलही केलं. इरफानच्या निधनानंतर मिथिलानं त्याला श्रद्धांजली देत इरफानचं व्यक्तिमत्वनं नेहमीत प्रेरित केल्याचं म्हटलं आहे. तिनं कारवां सिनेमातील हार्टक्वेक हे गाणं इरफानसाठी गायलं. या सिनेमात इरफाननं शौकत नावाची भूमिका साकारली होती. लॉकडाउनमध्येही अमिताभ बच्चन यांच्यासोबत KBC खेळण्याची संधी, असं करा रजिस्ट्रेशन
हा व्हिडीओ शेअर करताना मिथिलानं लिहिलं, ‘हाय शौकत हा #SingSongSaturday तुमच्यासाठी डेडिकेटेड आहे. मी नेहमीप्रमाणे गाणं आणि स्ट्रमिंग यांच्यामध्येच संघर्ष करत आहे. पण शिकण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामुळे मी तुम्हाला माझ्या बिना का गीतमालाने एक शेवटचं त्रास देऊ शकेन. जिथे कुठे असाल तिथे खूश राहा, खुदा हाफिद… प्रेम तान्या’ तान्या हे कारवा सिनेमात मिथिलानं साकारलेल्या भूमिकेचं नाव आहे. लॉकडाऊनमध्येही सलमान खान जिममध्ये गाळतोय घाम, जॅकलीननं शेअर केला PHOTO
मिथिला पालकरचा इरफानला श्रद्धांजली देण्याचा हा अंदाज युजर्सच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. तिच्या आवाजाचं सर्वजण कौतुक करत आहेत. मिथिलाच्या या व्हिडीओवरील कमेंटमध्ये फॉलोअर्सनी इरफानच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना केली आहे. ‘दर 2 महिन्यांनी मीडिया किम यांना मृत घोषित करते’, बॉलिवूड कलाकाराचा संताप