JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / धक्कादायक! 'या' प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप, सिनेसृष्टीत एकच खळबळ

धक्कादायक! 'या' प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप, सिनेसृष्टीत एकच खळबळ

मनोरंजन सृष्टीतील (Film Industry) कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.त्यांच्याबद्दल सतत काही ना काही धक्कादायक खुलासे होत असतात. नुकतंच समोर आलेल्या एका माहितीनुसार,मनोरंजनसृष्टीत खळबळ माजली आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा (Rape Case) आरोप लावण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 एप्रिल-   मनोरंजन सृष्टीतील   (Film Industry)  कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.त्यांच्याबद्दल सतत काही ना काही धक्कादायक खुलासे होत असतात. नुकतंच समोर आलेल्या एका माहितीनुसार,मनोरंजनसृष्टीत खळबळ माजली आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा  (Rape Case)  आरोप लावण्यात आला आहे. चित्रपटांमध्ये काम देण्याच्या आमिषाने महिलेसोबत शारीरिक संबंध बनवल्याचा आरोप या अभिनेत्यावर लावण्यात आला आहे. ही बातमी समोर येताच सर्वानांच धक्का बसला आहे. मल्याळम अभिनेता विजय बाबू   (Vijay Babu)  याच्यावर हा आरोप लावण्यात आला आहे. विजय बाबू मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय चेहरा आहे. अभिनेत्यासोबतच तो एक निर्माता आणि उद्योजकसुद्धा आहे. परंतु या अभिनेत्याबद्दल अशी माहिती समोर येताच मनोरंजनसृष्टी हादरुन गेली आहे. कोडीझोड भागात राहणाऱ्या पीडित महिलेने विजय बाबूविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या महिलेने तक्रार करत म्हटलं आहे, ‘चित्रपटांमध्ये काम देण्याच्या आमिषाने आपलं शारीरिक शोषण करण्यात आलं आहे’. ही माहिती समोर येताच एकच खळबळ माजली आहे. या पिडीत महिलेने आपल्या तक्रारीमध्ये सांगितलं आहे, ‘एर्नाकुल भागात असलेल्या आपल्या फ्लॅटवर या अभिनेत्याने कामाचं आमिष दाखवून आपल्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले आहेत. दरम्यान २२ एप्रिल रोजी या अभिनेत्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु अद्यापही पोलिसांनी या प्रकरणात अभिनेत्याची चौकशी केलेली नाहीय. विजय बाबूविरुद्ध बलात्कार आणि गंभीर प्रकारे शारीरिक इजा पोहोचवल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे. या अभिनेत्याचं ‘फ्राईडे फिल्म’ नावाचं प्रोडक्शन हाऊस आहे. विजय बाबूने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोबतच अनेक चित्रपटांची निर्मितीदेखील केली आहे. या घटनेने मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या