JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Siddharth Chandekar : कृत्य माझं, जबाबदारी माझी; गुरुपौर्णिमेच्या दिवशी असं का म्हणतोय सिद्धार्थ चांदेकर

Siddharth Chandekar : कृत्य माझं, जबाबदारी माझी; गुरुपौर्णिमेच्या दिवशी असं का म्हणतोय सिद्धार्थ चांदेकर

आजच्या दिवशी अनेक कलाकार आपापल्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत आहेत. पण अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने (Siddharth Chandekar) ‘कृत्य माझं. जबाबदारी माझी’ म्हणत गुरुपौर्णिमेचा एक वेगळाच संदेश आज दिला आहे. गुरुपौर्णिमेबद्दल नक्की काय भावना आहेत सिद्धार्थ चांदेकरच्या?

जाहिरात

Actor Siddharth Chandekar

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 13 जुलै: आज गुरुपौर्णिमा म्हणजे आयुष्यात आपल्याला घडवणाऱ्या, शिकवणाऱ्या व्यक्तींसमोर नतमस्तक होण्याचा दिवस. आजच्या दिवशी आपल्या गुरूंचे आभार मानायचे असतात, त्यांना शुभेच्छा द्यायच्या असतात. आजच्या दिवशी अनेक कलाकार आपापल्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत आहेत. पण अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने (Siddharth Chandekar) ‘कृत्य माझं. जबाबदारी माझी’ म्हणत गुरुपौर्णिमेचा एक वेगळाच संदेश आज दिला आहे. गुरुपौर्णिमेबद्दल नक्की काय भावना आहेत सिद्धार्थ चांदेकरच्या? चला जाणून घेऊया. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तो त्याच्या फोटोजना अतिशय भन्नाट कॅप्शन देत चाहत्यांसोबत ते शेअर करत असतो. आजसुद्धा सिद्धार्थने अतिशय हटके पद्धतीत चाहत्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ‘स्वतःमध्ये लपलेल्या स्वतःच्याच गुरूला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा’ असं त्याने पोस्ट शेअर करताना म्हटलंय. या पोस्टमध्ये सिद्धार्थने लिहिलंय कि, ‘माझा गुरु मीच. माझा शिष्य मीच. मीच चुका करणार. मीच सुधारणार. पडणार मीच. उचलणार मीच. साकारणार मीच. अनुभवणार मीच. कृत्य माझं. जबाबदारी माझी. आयुष्य माझं. जगणार मीच.’ अशा शब्दांमध्ये सिद्धार्थने स्वतःलाच गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.सिद्धार्थचा हा हटके अंदाज त्याच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. अनेकांनी पोस्टवर कमेंट करत त्याच्या या विचाराला पाठींबा दर्शवला आहे. हेही वाचा -  Congratulations Movie: पूजा सावंत- सिद्धार्थ चांदेकर पडद्यावर करणार रोमान्स! नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोशल मीडियावरून बऱ्याचदा हटके शब्दात  लिहीत असतो. त्याच्या भावना व्यक्त करत असतो. त्याची एक वेगळी शैली आहे. चाहत्यांनाही त्याचं लेखन आवडतं. त्यांच्याकडूनही सिध्दार्थला उत्तम प्रतिसाद मिळतो. अलीकडेच सिद्धार्थ आणि मिताली या जोडप्याने नवीन घर घेतलं तेव्हा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोशल मीडियावरून बऱ्याचदा हटके शब्दात  लिहीत असतो. त्याच्या भावना व्यक्त करत असतो. त्याची एक वेगळी शैली आहे. चाहत्यांनाही त्याचं लेखन आवडतं. त्यांच्याकडूनही सिध्दार्थला उत्तम प्रतिसाद मिळतो. अलीकडेच सिद्धार्थ आणि मिताली या जोडप्याने नवीन घर घेतलं तेव्हा त्याने जुन्या घरातील खिडकीसाठी खास पोस्ट लिहिली होती. ती  पोस्ट खूपच चर्चेत आली होती.

संबंधित बातम्या

सध्या सिद्धार्थ चांदेकर लंडनमध्ये त्याच्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लोकेश गुप्ते दिग्दर्शित Congratulations या चित्रपटामध्ये पूजा सावंत, अलका कुबलश सिद्धार्थ झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं शूटिंग लंडनमध्ये सूर झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या