JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका...’ मालिकांमधील वादात शशांक केतकरची उडी

‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका...’ मालिकांमधील वादात शशांक केतकरची उडी

मराठी मालिकांमध्ये सर्व ब्राह्मण मुलीच दिसतात इतर मराठी मुली का नाही असा प्रश्न ‘केसरी’ सिनेमाचा दिग्दर्शक सुजय डहाकेनं उपस्थित केला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 मार्च : ‘शाळा’ आणि ‘फुंत्रू’ या सिनेमांचा दिग्दर्शक सुजय डहाकेचा ‘केसरी’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. मात्र हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर एक नवा वादही मराठी सिनेसृष्टीत सुरू झाला आहे. या सिनेमाच्या रिलीजच्या आधी दिलेल्या एका मुलाखातीत त्यानं सध्या मराठीमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही? असा प्रश्न केला होता. ज्यामुळे नवा वादाला तोंड फुटलं आहे. यावर अभिनेत्री तेजश्री प्रधान नंतर अभिनेता शशांक केतकरनं आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘केसरी’ सिनेमाचा दिग्दर्शक सुजय डहाके यानं लोकसत्ता ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत मराठी मालिकांमध्ये सर्व ब्राह्मण मुलीच दिसतात इतर मराठी मुली का नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्या वक्तव्यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यावर शशांक केतकरही त्याच्या सोशल मीडिया पेजवर व्यक्त झाला आहे. त्यानं फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे ज्यात त्यानं सुजयवर सडकून टीका केली आहे. दिल्ली हिंसाचारावर रितेश देशमुखचा TikTok Video, असं काही म्हणाला की…

शशांकनं त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं, ‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिन बुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंट ला जागा आहे. कृपा करून हे असले स्टंट करू नकोस. त्या पेक्षा तुझ्या कामावर लक्ष दे जमल्यास. साने आणि मंजुळे हे कॉम्बिनेशन पुरेस नाहीये का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला? असो… कांबळे, छल्लारे आणि पवार यांच्या दिग्दर्शनाखाली हा केतकर रोज काम करतो आणि याचा मला अभिमान आहे. तू कोणत्या जाती धर्माचा आहेस याचा तसूभरही विचार डोक्यात न आणता तुझं कल्याणच होऊदे, तुझे चित्रपट चालू दे हीच इच्छा आहे. स्वतःहून 10 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता अभिनेता

याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधाननं तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं लिहिलं, ‘मी ब्राह्मण नाहीये बरं! सीकेपी आहे. पण गेली अनेक वर्ष माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणूया का?’ तेजश्रीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियवर खूप व्हायरल झाली आहे. मालिकांमधील वादावर भडकली तेजश्री प्रधान, म्हणाली ‘मी ब्राह्मण नाही पण मला…’ यंदा कर्तव्य आहे! 4 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर बॉलिवूड अभिनेता अडकणार विवाहबंधनात

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या