JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / EXCLUSIVE VIDEO बाहुबलीचा हिंदी आवाज होता या मराठी कलाकाराचा; 3 वर्ष झाल्यानंतर शेअर केला अनुभव

EXCLUSIVE VIDEO बाहुबलीचा हिंदी आवाज होता या मराठी कलाकाराचा; 3 वर्ष झाल्यानंतर शेअर केला अनुभव

प्रभासच्या भूमिकेसाठी ज्या मराठमोळ्या कलाकाराने आवाज दिला होता त्याने देखील बाहुबलीसाठी त्याच्या आवाजाची निवड कशी झाली याबाबत अनुभव शेअर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 एप्रिल : बाहुबली-2  हा सिनेमा प्रदर्शित होऊन आज 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. यामध्ये प्रभास, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, राणा दग्गुबाती यांसारख्या कलाकारांनी दमदार भूमिका निभावल्या आहेत. प्रभासने देखील बाहुबली-2 या सिनेमाला 3 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक भाऊक पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान प्रभासच्या भूमिकेसाठी ज्या मराठमोळ्या कलाकाराने आवाज दिला होता त्याने देखील बाहुबलीसाठी त्याच्या आवाजाची निवड कशी झाली याबाबत अनुभव शेअर केला आहे. आज न्यूज18 लोकमतच्या फेसबुक Live मध्ये अभिनेता शरद केळकरने हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याचे अनेक अनुभव सांगितले मात्र बाहुबलीसाठी त्याची झालेली निवड एकदम खास होती. (हे वाचा- आईच्या मृत्यूनंतर इरफान खानची तब्येत बिघडली, कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू ) शरद केळकरने बाहुबलीबाबत आठवण सांगताना म्हटले की, जेव्हा बाहुबलीचे शूटिंग सुरू होते त्यावेळी शरद एक तेलुगू सिनेमा करत होता. बाहुबलीचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली त्यावेळी प्रभास आणि राणा दोघांसाठीही हिंदी आवाज शोधत होते. एखाद्या कलाकाराच त्या भूमिकेच्या आवाजाला न्याय देऊ शकेल, त्यामुळे राजामौली अशा कलाकाराच्या शोधात होते. त्यावेळी त्यांना शरद बाबत कुणीतरी सांगितलं. राजामौली आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक असल्याने त्यांना भेटूनच व्हॉईस टेस्ट देणार, अशी इच्छा शरदने व्यक्त केली. राजामौलींनी त्याला भेटण्यास तयारी दाखवली आणि त्याचा आवाजही ऐकला. आणि अखेर बाहुबलीचा हिंदी आवाज ठरला हा मराठी कलाकार! (हे वाचा- ‘आयुष्यात खूप Ups & Downs आले पण…’, सुशांतबरोबरच्या ब्रेकअपबद्दल बोलली अंकिता ) दरम्यान शरद केळकरने यावेळी मराठी चित्रपटात लीड रोल मिळत नसल्याची खंतही व्यक्त केली. जेव्हा त्याच्या चाहत्यांनी विचारलं की मराठीत मुख्य भूमिकेत का दिसत नाही त्यावेळी ‘तुम्हीच दिग्दर्शकांना सांगा मुलगा चांगलं काम करतो’, असं देखील तो गंमतीत म्हणाला. मराठीमध्ये महत्त्वाची भूमिका करण्याची इच्छाही यावेळी त्याने व्यक्त केली. शरद एका ऐतिहासिक मराठी चित्रपटावर काम करत असल्याचेही यावेळी त्याने सांगितले.

सध्या चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन जगतातील सर्वच कलाकार लॉकडाऊनमुळे घरीच आहेत. प्रत्येक जण त्यांच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे. हे सर्व कलाकार त्यांच्या फॅन्सशी जोडले राहण्याचं एकमेव साधन म्हणजे सोशल मीडिया. दरम्यान न्यूज18 लोकमतच्या फेसबुक पेजवर अनेक कलाकारांनी Live करत त्यांच्या चाहत्यांशी गप्पा मारल्या आहेत. आज या लाईव्हमध्ये शरद केळकर सहभागी झाला होता.

संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या