JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Manoj Bajpayee: अभिनेते मनोज बाजपेयी अंबाबाईच्या चरणी; कोल्हापुरातील प्रसिद्ध मंदिरात केलं ध्यान

Manoj Bajpayee: अभिनेते मनोज बाजपेयी अंबाबाईच्या चरणी; कोल्हापुरातील प्रसिद्ध मंदिरात केलं ध्यान

आपल्या दमदार अभिनयामुळे सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते म्हणजे मनोज बाजपेयी. विविध धाटणीच्या भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे.

जाहिरात

मनोज बाजपेयी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 डिसेंबर : आपल्या दमदार अभिनयामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते म्हणजे मनोज बाजपेयी . विविध धाटणीच्या भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे. ते नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अशातच मनोज बाजपेयी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्या चर्चेत येण्याचं कारण काही खासच आहे. सुप्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांनी शुक्रवारी सांयकाळी वृक्षप्रसाद योजनेच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत अभिनेते सयाजी शिंदेही उपस्थित होते. कोल्हापूर आणि सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री महालक्ष्मी मंदिरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांनी अंबाबाई मंदिरात ध्यान केलं असल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत ईटीव्ही भारतने वृत्त दिलं आहे. हेही वाचा -  Jubin Nautiyal ला रुग्णालयातून डिस्चार्ज; हेल्थ अपडेट शेअर करत म्हणाला ‘देवाने मला…’ मनोज बाजपेयी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांना ‘सत्या’ चित्रपटामुळे एक वेगळी ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी साकारलेला भिकू म्हात्रे प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. त्यांची ही भूमिका चांगलीच गाजली. 90 च्या दशकातील या कल्ट क्लासिक चित्रपटाने आपल्याला अनेक उत्तम पात्रे आणि गाणी दिली. या भूमिकेसाठी त्यांना प्रथमच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यांनी मागेच एक पोस्ट शेअर करत भिकू म्हात्रे पुन्हा येणार असल्याचं सांगतिलं होतं. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांनी पुन्हा त्या भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्साही आहेत.

मनोज वाजपेयींची फिल्मी कारकीर्द जितकी चढ-उत्तरांनी भरलेली होती. तितकीच त्यांची पर्सनल लाईफसुद्धा कठीण प्रसंगांनी भरलेली होती. आज या अभिनेत्याने चित्रपट, वेबसीरीज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाचा कस दाखवला आहे. परंतु मनोज यांच्या खाजगी आयुष्याबाबत बोलायचं झालं, तर या अभिनेत्याने एक नव्हे तर दोनदा लग्न केलं आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी दिल्लीतील एका मुलीसोबत लग्न केलं होतं. परंतु हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही.अवघ्या दोन वर्षात त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं. मनोज यांनी 2006  मध्ये अभिनेत्री शबाना रजा उर्फ नेहासोबत दुसरं लग्न केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या