सुशांत सिंह राजपूत
मुंबई, 23 डिसेंबर : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत च्या आत्महत्येनं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. त्याने उचललेल्या या धक्कादायक पावलामुळे अनेकजणांना झटका बसला होता. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आता त्याच्यासोबत त्याच्या पहिल्या चित्रपटात काम केलेल्या अभिनेता अमित साधने त्याच्या मृत्यूविषयी वक्तव्य केलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा अभिनेत्याच्या मानसिकतेवर वाईट परिणाम झाल्याचा खुलासा त्याने केला आहे. अनेक वर्षांनंतर आता अमित साधने सुशांतच्या आत्महत्येवर आपले वक्तव्य केले आहे. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर अभिनेता अमित साधला इंडस्ट्री सोडायची होती. अमित साधने 4 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचाही खुलासा केला आहे. सुशांतची आठवण काढत लेखक चेतन भगत यांच्या पॉडकास्टमध्ये अमित साध यांनी या सगळ्या गोष्टींविषयी खुलासा केला. हेही वाचा - Aryan Khan: पठाण रिलीजआधीच शाहरुखच्या लेकाला मोठा दिलासा, समोर आली महत्त्वाची माहिती अमित साधने मुलाखतीदरम्यान सांगितलं की, ‘मला सुशांतची मानसिकता माहीत होती. एखाद्याचा आत्महत्येने मृत्यू झाला तर त्याचा अर्थ असा होतो की त्याने त्याच्या आयुष्यातील काही पैलू लपवून ठेवले आहेत, जेव्हा हे घडते तेव्हा ती त्या व्यक्तीची चूक नसते. आजूबाजूचे लोक ते गंभीर प्रकरण ओळखू शकले नाहीत. तो माणूस इतका निराश झाला की त्याने आत्महत्या केली.’
अमित पुढे म्हणाला, सुशांतच्या मृत्यूनंतर मी चिडलो होतो. मला इंडस्ट्री सोडायची होती. अभिनय क्षेत्र खूप कठिण आहे. यावेळी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचंही सांगितलं. 16 ते 18 वय असताना त्याने 4 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची मानसीकता माहिती आहे. सुशांतच्या मृत्यूच्या 3-4 महिन्यांपूर्वी मी सुशांतला ओळखत असणाऱ्या व्यक्तींसोबत बोललो मात्र कुणाकडेच सुशांतचा नंबर नव्हता. त्याने स्वतःला सर्व लोकांपासून दूर केले होते. त्याने त्याचा नंबरही बदलला होता. दरम्यान, अमित साध आणि सुशांत सिंह राजपूत या दोघांनीही ‘काय पो छे’ चित्रपटात एकत्र काम केले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुशांत आणि अमित यांची घट्ट मैत्री झाली.