JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / श्वेता तिवारीच्या Ex Husband ने शेअर केले पर्सनल चॅट, अभिनेत्रीला संताप अनावर

श्वेता तिवारीच्या Ex Husband ने शेअर केले पर्सनल चॅट, अभिनेत्रीला संताप अनावर

श्वेता तिवारीचा पती अभिनव कोहलीनं एका मुलाखतीत असे काही खुलासे केले आहेत ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जून : अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते. दोन लग्न अयशस्वी ठरलेल्या श्वेताबद्दल मागच्या काही दिवसांपासून तिच्या दुसरा पती अभिनव कोहलीमुळे खूप चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनवनं एका मुलाखतीत तो आणि श्वेता वेगवेगळे राहत नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता त्यानं श्वेता सोबतचे त्याचे चॅट सोशल मीडियावर शेअर केल्यानं खळबळ उडाली आहे आणि आता यावर श्वेतानं सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. श्वेता तिवारीचा पती अभिनव कोहलीनं एका मुलाखतीत असे काही खुलासे केले आहेत ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यानंतर आता त्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. अभिनवनं श्वेता सोबतचे पर्सनल चॅट त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामुळे आता श्वेता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘असाच चमकत राहा…!’ दिशा पाटनीनं आदित्य ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनव कोहलीनं शेअर केलेले हे चॅटचे स्क्रिनशॉट 12 एप्रिलचे आहेत. ज्यात अभिनव सांगतो, मला पुन्हा उद्या जावंच लागेल कारण फूड प्रोसेसरचं वॉरंटी कार्ड कुठे हरवलं आहे. अभिनवचा दावा आहे की, हे चॅट श्वेता आणि त्याचे आहेत. श्वेता यात अभिनवला म्हणते, हे कसं झालं? यासोबतच ती दुसरा मेसेज करते करते लवू (पलक तिवारी) ला सुद्धा जायचं आहे. अभिनव म्हणतो, ठिक आहे तिलाही घेऊन जाऊयात. त्यानंतर श्वेता म्हणते उद्या माझ्या कार मध्ये पेट्रोल भरायचं आहे. त्यावर अभिनव लिहितो, हा ते काम सुद्धा आहे. याशिवाय याआधी अभिनवनं एक पोस्ट केली आहे ज्यात त्यानं श्वेतानं त्याच्याविरोधात तक्रार दाखलं केली नसल्याचंही म्हटलं आहे. ‘मिस वर्ल्ड झालीस म्हणून तू अभिनेत्री होशील?’ प्रियांकावर का ओरडला कोरिओग्राफर

आता या सर्व प्रकारावर श्वेतानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिनं अभिनव कोहलीचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. स्पॉटबॉय-ईला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, मी अभिनवसोबत राहत नाही. आजकाल कोणी काही सांगतं आणि ते छापलं जातं. यावरूनच समजतं की, लोक किती खोटं बोलत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईला झाला कोरोना, दिल्ली सरकारकडे केली मदतीची मागणी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या