JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Holi 2023: होळीच्या दिवशी माहोल मुलींचं भन्नाट रील व्हायरल; 'या' अभिनेत्यानेही दिली अशी साथ

Holi 2023: होळीच्या दिवशी माहोल मुलींचं भन्नाट रील व्हायरल; 'या' अभिनेत्यानेही दिली अशी साथ

मराठीतील प्रसिद्ध अभिनेते एकत्र येत होळीची पार्टी करताना दिसतायत. या कलाकारांचं एक भन्नाट रील सध्या समोर आलं आहे.

जाहिरात

मराठी कलाकार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 मार्च : आज सगळीकडे धुलिवंदनाचा उत्साह आहे. सगळीकडेच खूप जल्लोषात होळी खेळली जात आहे. सामान्यांप्रमाणेच कलाकार देखील धुळवड साजरी करताना दिसतायत. यात अनेक मराठी कलाकार देखील मागे नाहीत. ठिकठिकाणी मराठी कलाकार रंग खेळत आहेत. तर अनेक मालिकांच्या सेटवर देखील बिनधास्त आजची धुळवड साजरी केली जातेय. अनेक कलाकारांचे फोटो आतापर्यंत समोर आले आहेत. यातच आता मराठीतील प्रसिद्ध अभिनेते एकत्र येत होळीची पार्टी करताना दिसतायत. या कलाकारांचं एक भन्नाट रील सध्या समोर आलं आहे. मराठी कलाकार एकमेकासोबत आजची धूलिवंदन साजरं करत आहेत. मराठी माहोल मुलींचा ग्रुप म्हणजेच अभिनेत्री समिधा गुरू, भार्गवी चिरमुले, सई रानडे या एकत्र होळी साजरी करतायत पण यामध्ये अजून एका अभिनेत्रीची भर पडली आहे ती म्हणजे सुखदा खांडेकर. तसेच यांच्यासोबत अभिनेता अभिजित खांडेकर आणि अभिजित गुरु हे सुद्धा या सगळ्या अभिनेत्रींसोबत होळीच्या दिवशी धमाल करताना दिसून येतायत. वाकडी वेणी अन् गुडघ्यावर स्कर्ट; होळीसाठी उर्फीचा अजब अवतार पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स नुकतंच या साल्यानी सोशल मीडियावर एक रील शेअर केलं आहे. या रील व्हिडिओमध्ये हे सगळे कलाकार धमाल नाचताना दिसतायत. अभिनेत्री समिधा गुरू, भार्गवी चिरमुले, सई रानडे आणि सुखदा या चौघी छबीदार छबी या गाण्यावर थिरकताना दिसतायत तर त्यांना अभिजित खांडेकर देखील साथ देताना दिसतोय. या कलाकारांचं हे धमाल रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहते विविध प्रतिक्रिया देताना दिसतायत.

संबंधित बातम्या

या रिलमध्ये दिसणारे सगळे कलाकार एकमेकांचे चांगले मित्र आहेत. हे सगळेजण बऱ्याचदा सोबत दिसतात. हे रील शेअर करताना सुखदाने ‘अशा प्रकारे आम्ही होळी साजरी करतोय.’ असं लिहिलं आहे. या कलाकारांचं धमाल पाहून चाहते चांगलेच खुश झाले आहेत. या कलाकारांचं हे रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या रिलमध्ये असणारे सगळेच कलाकार मराठी मालिकांमध्ये सध्या व्यस्त आहेत. अभिनेता अभिजित खांडेकर सध्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत मुख्य भूमिका साकारतोय. त्याची मालिका घराघरात लोकप्रिय आहे. तर भार्गवी चिरमुले आणि समिधा गुरु या दोघी अभिनेत्री देखील विविध मालिकांमध्ये सध्या काम करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या