JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Live Video दरम्यान पती मेहुलचा विषय निघताच अभिज्ञा भावे झाली भावुक

Live Video दरम्यान पती मेहुलचा विषय निघताच अभिज्ञा भावे झाली भावुक

अभिज्ञा भावे अचनाक लाईव्ह येत चाहत्यांना धक्का दिला. पण यावेळी पती मेहुल पैच्या कॅन्सरचा विषय निघताच ती काहीशी भावुक झाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 मार्च- अभिज्ञा भावे ( abhidnya bhave) ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. . ती तिचे विविध फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या ती झी मराठीवरील तू तेव्हा तशी मालिकेत पुष्पवली साकारताना दिसत आहे. भूमिका जरी नकारात्मक असली तरी प्रेक्षकांकडून दिला भरभरून प्रेम मिळत आहे. नकतचं अभिज्ञा भावेने इन्स्टा लाईव्ह येत चाहत्यांशी संवाद साधला. खरं तर ती बऱ्याच दिवसांनी लाईव्ह आली होती. यावेळी चाहत्यांनी नवरा मेहुल पैच्या प्रकृतिविषयी विचारलं तेव्हा अभिज्ञा काहीशी भावुक झाली. अभिज्ञा भावेने तू तेव्हा तशी मालिकेच्या सेटवरील एक व्हिडिओ इन्स्टा व्हिडिओ शेअर केला आहे. खूप दिवसांनी ती इन्स्टावर लाईव्ह आली होती. यावेळी ती पुष्पवल्लीच्या गेटअपमध्ये दिसली. यावेळी चाहत्यांशी तिनं मालिकेबद्दल गप्पा मारल्या शिवाय तिची भूमिका आवडते आहे का नाही याबद्दल देखील विचारलं. या संपूर्ण व्हिडिओत ती काहीशी शांत शांत होती. वाचा- पांढऱ्या साडीत खुललं रूपाली भोसलेचं सौंदर्य, ब्लॅक &व्हाईट फोटोंनी वेधलं लक्ष याबद्दल देखील अभिज्ञा म्हणाली,मागच्या काही दिवसांपासून माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी लाईव्ह आले नव्हते. मला खरं तर आता काय बोलाव हे समजत नाही पण सगळं आता ओके असल्याचे तिनं सांगितलं. यावेळी तिला अनेकांनी मेेहुल पैच्या प्रकृतीविषयी विचारलं. यावेळी ती काहीशी भावुक झाली. ती म्हणाली की, मेहुलची तब्येत ठीक आहे त्याला एक ते दोन महिने लागतील रिकव्हर व्हायला.. घऱचे देखील ओके असल्याचे तिनं सांगितलं त्यानंतर तिनं लवकरच लाईव्ह येऊ म्हणत सर्वांचा निरोप घेतला. शिवाय ती म्हणाली की मी लवकरच लाईव्ह येईल तेव्हा नक्की तुम्हाल सागून येईल…शिवाय माझ्यावर असचं प्रेम करत राहा मला आता तुमच्या प्रेमाची सगळ्यात जास्त गरज असल्याचे देखील ती यावेळी म्हणाली. वाचा- ट्रॅफिकमध्ये अडकलाय..मग प्रसाद-मंजिरी ओकचा हा व्हिडिओ नक्की पाहा…   अभिज्ञाचा पती मेहुल पैला ( mehul pai suffering cancer ) कॅन्सर असल्याचे निदान काही महिन्यापूर्वी झालं. सध्या मेहुल उपचार घेत आहे. मेहुलनं इन्स्टा पोस्ट करत याबद्दल माहिती दिली होती. मैहुलने पोस्टमध्ये म्हटलं होतं की, मला माझ्या आयुष्यात असे अनेक मूर्ख भेटले आहेत, परंतु कर्करोग हा त्यापैकी सर्वात मोठा आहे…माफ करा मला…कॅन्सर..तू चुकीच्या व्यक्तीला निवडलं आहेस…

संबंधित बातम्या

अभिज्ञा भावेचे मेहुलची लव्हस्टोरी फिल्मी आहे.अभिज्ञा आणि मेहुल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. 15 वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखायचे. मात्र कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला होता. काही दिवसांनी हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यातली मैत्री पुन्हा फुलत गेली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. अभिज्ञाप्रमाणे मेहुलचा देखील घटस्फोट झाला असल्यानं दोघांनीही त्यांच्या नात्याला लग्नात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 6 जानेवारी 2021 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली .अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे या दोघांच्या लुकनी सर्वांचे लक्ष वेधले होते.अभिज्ञाचा पती मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या 12 वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या