अब्दू रोजिक
मुंबई, 23 डिसेंबर : ‘बिग बॉस’ चा प्रत्येक सीझन चांगलाच लोकप्रिय ठरतो. बिग बॉसचा 16 वा सीझन सुरु असून यंदाच्या सीझन चांगलाच वादग्रस्त ठरत आहे. जसा जसा बिग बॉसच्या शो पुढे सरकत आहे तस तसा सदस्यांचा खरा चेहरा समोर येत आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात खूप हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. घरातील सगळयात लोकप्रिय स्पर्धक म्हणजे अब्दू रोजीक . तो कायमच चर्चेत राहतो. बिग बॉसमुळे त्याचे चाहते घराघरात आहेत. पण आता मागच्या आठवड्यात अब्दुला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला. पण आता त्याच्याविषयी मोठी अपडेट समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अब्दू रोजिक बिग बॉस 16 मध्ये पुन्हा परतला आहे आणि सध्या घरामध्ये आहे. त्याची झलक वीकेंड का वारमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याला पाहून घरातील सदस्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही. विशेषत: शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन त्याला पुन्हा पाहून खूप खुश आहेत. हेही वाचा - Bigg Boss Marathi 4: अखेर राखीची प्रतीक्षा संपणार; बिग बॉसच्या घरात तिच्या भेटीला येणार खास पाहुणा अब्दू रोजिकशी संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे की, तो काही दिवसांसाठीच शोमध्ये आला आहे. कामाच्या कमिटमेंटमुळे त्याला जानेवारी महिन्यातच शो सोडावा लागणार आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
अब्दू रोजिकला बिग बॉसने बाहेर काढलं नसून त्याच्या मॅनेजमेंट टीमनेच बिग बॉसला तशी विनंती केली होती. त्यानंतरच त्याला शोमधून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली. अब्दू रोजिकवर एक व्हिडिओ गेम तयार करण्यात येणार आहे, ज्यासाठी त्याची गरज होती. अब्दु बाहेर पडताच त्याच्या गेमचा टीझरही रिलीज करण्यात आला होता. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर अब्दु रोजिकही लाइव्ह आला होता. त्याने काही वेळ चाहत्यांशी संवाद साधला. तो म्हणाला, ‘बिग बॉस हा सर्वोत्तम शो आहे, मला बिग बॉस खूप आवडतो. मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. मी खूप आनंदी आहे.’ यासोबतच अब्दूने सांगितले होते कि तो शोमध्ये परतणार आहे, आता प्रेक्षकांना पुन्हा बिग बॉसच्या घरात लाडक्या अब्दुला पाहायला मिळणार आहे.
बिग बॉस 16 मध्ये या आठवड्यात सलमान खानसोबत मनीष पॉल हा शो होस्ट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा घरात पाहुणे म्हणून येणार आहेत. सलमान या आठवड्यात शालीन आणि एमसी स्टॅनला त्यांच्या घरातल्या वागणुकीसाठी खडे बोल सुनावणार आहे. विशेषतः शालीनला धमकावल्याप्रकरणी एमसी स्टेनला फटकारले जाईल. त्यामुळे हा आठवडा खूपच रंजक असणार आहे.