बेशरम रंग गाण्याने केला नवीन विक्रम!
काही दिवसांपूर्वी पठाण सिनेमातील बेशरम रंग हे गाणं प्रदर्शित झालं.
बेशरम रंग गाण्यामुळे देशात वादाचा आणखी एक नवीन रंग उधळला गेला आहे.
सोशल मीडियावर तर हे गाणं खूपच व्हायरल झालं आहे.
एकीकडे या गाण्यावरून वाद झडत आहेत, तर दुसरीकडे याच गाण्याबाबत नवीन विक्रम रचला जात आहे.
वादंगाच्या पार्श्वभूमीवर बेशरम रंग गाण्याला आतापर्यंत 100 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
गाण्यामध्ये दीपिकानं घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून या वादाला सुरुवात झाली.
गाण्यात नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी अनेकांनी हे युट्यूबला जाऊन हे गाणं पाहिलं.
त्यामुळे अवघ्या दहा दिवसांत या गाण्याला 100 मिलियन व्ह्जू मिळाले आहेत.
थोडक्यात काय तर बेशरम रंगवरून निर्माण झालेल्या वादाचा फायदा त्या गाण्यालाच झाला आहे.