JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Abdu Rozik: बिग बॉसमधून बाहेर येताच अब्दू रोजिक सोडणार भारत; आता करणार 'हे' काम

Abdu Rozik: बिग बॉसमधून बाहेर येताच अब्दू रोजिक सोडणार भारत; आता करणार 'हे' काम

बिग बॉसमधुन या आठवड्यात अब्दुला घराचा निरोप घ्यावा लागला आहे. आता त्यानंतर त्याने घराबाहेर पडण्याचं कारण सांगितलं आहे.

जाहिरात

अब्दू रोजीक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15  जानेवारी:  ‘बिग बॉस 16 ’ हा शो लवकरच अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. शोमध्ये रोज नवनवे आणि मजेदार ट्विस्ट येत आहेत. नुकताच अब्दु रोजिक अचानक घराबाहेर पडला. घरातील सगळयात लोकप्रिय स्पर्धक म्हणजे अब्दू रोजीक . तो कायमच चर्चेत राहतो. बिग बॉसमुळे त्याचे चाहते घराघरात आहेत. मध्यंतरी अब्दुने घरात पुन्हा एंट्री घेतली होती. पण त्याच्या चाहत्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण आता या आठवड्यात अब्दुला पुन्हा बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे. आता बाहेर येताच अब्दू भारत सोडणार आहे. नुकतंच  ‘बॉम्बे टाईम्स’ने अब्दूशी खास संवाद साधला आणि त्याला त्याच्या बाहेर पडण्याचे कारण विचारले. अब्दूने यावर बरेच काही सांगितले आहे आणि त्याच्या भविष्यातील योजनांबद्दलही मोठे खुलासे केले आहेत. यावेळी अब्दुला त्याचं बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचं कारण विचारलं असता तो म्हणाला कि, ‘मला शो सोडावा लागला कारण माझ्यासाठी समोर खूप काम पडलं आहे आणि त्यामुळे मला त्यासाठी घराबाहेर पडावे लागले. आता बऱ्याच गोष्टी पुढ्यात आहेत आणि त्यासाठी मी उत्सुक आहे. हेही वाचा - Shivani Baokar: ‘लागीर झालं जी’ च्या शीतलीला मिळाली नवी मालिका; ‘झी मराठीवर पुन्हा घेणार दमदार एंट्री त्याला पुढील काही दिवसांच्या योजनांबद्दल विचारले असता  तो म्हणाला, ‘मी पुढील काही दिवस भारतात आहे. मी इथे एका गाण्याचे शूटिंग करणार आहे. त्यानंतर मी दुबईला काही कामासाठी जाईन आणि तिथून मला अमेरिकेला जाणार आहे.’ तसेच त्याला पुन्हा भारतात कधी येणार याविषयी विचारले असता  तो म्हणाला, ‘मी भारतात परत येण्याचा विचार करत आहे. लोकांनी मला खूप प्रेम दिले आहे आणि मला येथे खूप काम करायचे आहे. त्यामुळे मी लवकरच परत येईन.’

संबंधित बातम्या

भारतात एखादे घर विकत घेण्याची किंवा भाड्याने घेण्याची त्याची योजना आहे का, असे विचारले असता, अब्दू म्हणाला, “मला अद्याप माहित नाही. ‘पण मी पुन्हा पुन्हा येत राहीन. जर काम येत राहिले तर मी इथेच राहीन आणि एक दिवस कदाचित मी येईन. माझेही भारतात घर आहे. पण हे सर्व मला मिळणाऱ्या कामावर अवलंबून आहे.’

बिग बॉस 16 मध्ये अब्दूने खूप धमाल केली आहे. तो म्हणाला, ‘मला घरात खूप मजा आली आहे. ते चांगले आणि खूप मजेदार होते. आता तो बाहेर पडल्यानंतर चाहते त्याला नक्कीच मिस करणार आहेत. एवढंच नाही तर काल अब्दुने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतल्यानंतर सगळे स्पर्धक सुद्धा भावुक झालेले पाहायला मिळाले. शिव ठाकरे आणि निम्रत तर अब्दुच्या आठवणीत ढसाढसा रडले. त्यामुळे सगळ्यांचा लाडका अब्दू आता पुन्हा पडद्यावर कुठे दिसणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या