deepak tijori
मुंबई, 20 मार्च : ‘जो जीता वही सिंकदर’, ‘आशिकी’ सारख्या प्रसिद्ध सिनेमात काम करणारा अभिनेता दीपक तिजोरी बाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. अभिनेत्याला त्याच्या को-प्रोड्यूसरनं करोडो रुपयांचा चुना लावला आहे. अभिनेता दीपक तिजोरीची 2.6 कोटींची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्यानं अंबोली पोलीस स्थानकात झालेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली आहे. को प्रोड्यूसर मोहन नादर याच्या विरोधात दीपकनं तक्रार दाखल केली आहे. दोघे एकाच प्रोजेक्टवर काम करत असताना मोहननं दीपक तिरोजीला कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं अभिनेत्यानं म्हटलं आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत असून दीपक तिजोरीच्या तक्रारीनंतर मोहन नादर विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. ANIने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि 406 अन्वये या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. ई-टाईम्सच्या रिपोर्टनुसार दीपक तिरोजीनं 10 महिने आधी मोहन नादरकडे पैसे मागितले होते. पण त्यानं पैसे दिले नाहीत. त्यामुळे दीपक नादरनं त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. सिनेमाच्या लोकेशन शुटसाठी पैसे मागून 2.6 कोटी रुपये हडपल्याचं अभिनेत्यानं म्हटलं आहे. हेही वाचा - गर्लफ्रेंडचा रूसवा काढण्यासाठी खिलाडी कुमार करायचं ‘हे’ काम ; शिल्पा शेट्टी अक्षय कुमारसोबतच्या नात्यावर स्पष्टच बोलली टिप्प्सी या सिनेमासाठी 2019मध्ये दीपक तिजोरी आणि मोहन नादर यांनी एक कॉन्ट्रॅक्ट साइन केलं होतं. दीपक तिजोरीकडून 2.6 कोटी रूपये घेऊनही मोहनने हा सिनेमा पूर्ण केला नाही असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मोहनकडून पैसे मागितले असता त्यानं एकदा एक चेक दिला पण तो चेक बाउंस झाला. अंबोली पोलीस स्थानकातील वरिष्ठ निरिक्षक बंडोपंत बंसोडे या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दीपक तिजोरी यानं तक्रारीत म्हटलं आहे की, सप्टेंबर 2019मध्ये लंडनमध्ये मोहन नादरनं एका लोकेशनचं पेमेंट करण्यासाठी माझ्याकडे पैसे मागितले होते. लंडनहून परत आल्यानंतर मी त्याच्याकडे पैसे मागितले पण त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. टिप्प्सी सिनेमाचं शुटींग 2019मध्ये लंडनमध्ये सुरू झालं होतं. माझ्याकडून इतके पैसे घेऊनही मोहननं हा प्रोजेक्ट पूर्ण केला नाही माझ्या पैशांचं त्यानं पूर्णपणे नुकसान केलं.
अभिनेते अशोक तिजोरी यांच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झालं तर, त्यांना आशिकी या सिनेमातून 1990मध्ये त्यांच्या अभिनयाला सुरूवात केली. त्यानंतर खिलाडी, जो जिता वही सिकंदर, दुल्हन हम ले जाएंगे, राजा नटवरलाल सारख्या अनेक सिनेमात त्यांनी काम केलं. त्याशिवाय उप्स, फरेब, फॉक्स आणि दो लफ्जो ही कहानी सारखे सिनेमे दिग्दर्शित देखील केले आहेत.