सुष्मिता सेन
मुंबई, 30 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने बॉक्स ऑफिसनंतर ओटीटी वर देखील दमदार पदार्पण केलं. तिची ‘आर्या’ वेब सीरिज चांगलीच गाजली होती. या वेब सिरींजमधून अनेक वर्षांनी सुश्मिताने कमबॅक केलं होतं. या सीरिजचे दोन सीझन प्रदर्शित झाले आहे. या दोन्ही सीझनमध्ये सुश्मिता सेनच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. ऍक्शन, थ्रिल आणि सस्पेन्स असलेल्या या सीरिजने ओटीटीवर चांगलाच धुमाकूळ घातला. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुश्मिता तिसऱ्या सीझनच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. नुकताच या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनचा टीझर प्रदर्शित झाला. ‘आर्या’ या वेब सिरीजच्या तिसऱ्या सीझनचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला. सुश्मिता सेनने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘आर्या ३’चा टीझर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुश्मिता खूपच डॅशिंग लुकमध्ये दिसत आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आर्या २’मध्ये सुश्मिताने तिच्या विरोधकांना संपवून आपल्या मुलांना घेऊन देश सोडून फरार झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. तिच्या मते आता सगळं काही ठीक झालं आहे. पण असं नाहीये, तिचा आणखी एक विरोधक आहे. ज्याची एंट्री ‘आर्या ३’ मध्ये दाखवली जाणार आहे. हेही वाचा - Kangana Ranaut: इंदिरा गांधींनंतर कंगना साकारणार नर्तिकेची भूमिका; ‘या’ चित्रपटासाठी घेतेय मेहनत 2021 मध्ये रिलीज झालेल्या ‘आर्य 2’ मध्ये सुष्मिता सेनने तिच्या शत्रूंना मारले होते आणि ती मुलांसह देश सोडून फरार झाली होती. त्यांना वाटले की आता सर्व काही ठीक आहे, परंतु त्यांनी वापरलेली युक्ती आता त्यांच्यावर उलटली आहे. त्याचा एक शत्रूही आहे, ज्याची एन्ट्री आर्या ३ मध्ये दाखवण्यात येणार आहे.
टीझरमध्ये सुष्मिता सेन तीच सिगार वापरताना दिसत आहे जी तिने आपल्या शत्रूकडून गुपचूप हिसकावून घेतली होती. टशनमध्ये बसलेल्या सुष्मिता सेनचा लूक खूपच मस्त दिसत आहे. काळा ओव्हरकोट आणि सन ग्लासेस घातलेली ही अभिनेत्री एकदम किलर दिसत आहे. आर्या 3 चा टीझर शेअर करताना सुष्मिताने सांगितले की सध्या आर्या 3 चे शूटिंग सुरु आहे. तो लवकरच डिस्ने हॉटस्टार प्रवाह असेल.
सुष्मिताला आता पुन्हा आर्याच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. आता दोन्ही सीझनप्रमाणे आर्या’ चा तिसरा भाग लोकप्रिय होणार का ते पाहणं महत्वाचं आहे. सुष्मिता सेनच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं तर ती आर्या सोबतच येणाऱ्या काळात ताली या वेबसिरीज मध्ये देखील दिसणार आहे. 6 ऑक्टोबर रोजी सुष्मिता सेनने ‘ताली’ या वेब सीरिजमधील तिचा लूक शेअर केला होता. यामध्ये यामध्ये अभिनेत्री ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत पुन्हा एकदा आपलं कलाकौशल्य सिद्ध करताना दिसणार आहे. ‘ताली’ या मालिकेत सुष्मिता सेनसोबत ‘आर्य’ फेम अंकुर भाटियाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.