अथिया-के. एल राहुलच्या लग्नाचे कधीही न पाहिलेले फोटो आले समोर!

अभिनेत्री अथिया शेट्टीने  क्रिकेटपटू केएल राहुलशी सोमवारी  लग्नगाठ बांधली.

या जोडप्याने सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये लग्न केलं.

लग्न होऊन आठवडा उलटला तरी या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अथिया शेट्टीने या दोघांच्या लग्नाच्या विधींचे फोटो नुकतेच पोस्ट केले आहेत.

लग्नानंतर आता अथिया आणि केएल राहुलच्या हळदी सभारंभाचे फोटो समोर आले आहेत.

अथिया आणि केएल राहुलच्या हा सोहळा अगदी पारंपारिक पद्धतीने पार पडला.

यातील एका फोटोत अथियाच्या हातात पानाचा विडा पाहायला मिळत आहे.

अथियाने हे फोटो शेअर करत करताना मराठीत कॅप्शन दिले आहे.

अथियाने या फोटोला ‘सुख’ असे कॅप्शन दिले.