आमिर रजा हुसैन यांचं निधन
मुंबई, 4 जून- गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन धक्का देणाऱ्या अनेक गोष्टी घडल्या आहेत. यामध्ये अनेक नावाजलेल्या कलाकारांनी जगाचा निरोप घेत सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. दरम्यान आता इंडस्ट्रीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे उत्कृष्ट दिग्दर्शक-अभिनेते आमिर रजा हुसैन यांनी अचानक एक्झिट घेत सर्वांनाच धक्का दिला आहे. अभिनेत्याचं वयाच्या 66 व्या वर्षी निधन झालं आहे. या घटनेने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते आमिर रजा हुसैन यांचा जन्म 6 जानेवारी 1957 मध्ये कुलीन अवधी कुटुंबात झाला होता. दुर्दैवाने त्यांच्या लहानपणातच त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे एकट्या आईने त्यांचा सांभाळ केला होता. हुसैन यांनी मेयो कॉलेज अजमेर येथून आपलं शैक्षणिक शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांनंतर त्यांनी विविध शिक्षण संस्थामांधून आपलं पुढील शिक्षण पूर्ण केलं होतं. तसेच त्यांनी अनेक दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शकांसोबत थियेटरमध्ये काम केलं होतं. Chiranjeevi News: कॅन्सर झाल्याच्या बातम्यांवर अखेर चिरंजीवींनी सोडलं मौन; ट्विट करत सांगितलं सत्य तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, अलीकडच्या रिलीज झालेल्या ‘बाहुबली’, ‘आरआरआर’ आणि आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटांच्या आधीच आमिर रजा हुसैन यांच्या क्रिएटिव्ह बुद्धीने लोकांना ’ द फिफ्टी डेड वॊर’च्या माध्यमातून मेगा थियेटर प्रोडक्शनचा अनुभव घेण्याची संधी दिली होती. या चित्रपटाने सर्वानांच थक्क केलं होतं.या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी कारगिल युद्धाची अशी मांडणी केली होती की, आजही लोकांना प्रत्येक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं.
आमिर रजा हुसैन यांनी आपलं अख्ख आयुष्य थियेटरमध्ये अभिनय करण्यात वेचलं आहे. ते एक दमदार अभिनेता तर होतेच शिवाय ते एक उत्तम दिग्दर्शक होते. आमिर रजा हुसैन यांनी दोन चित्रपटामध्ये काम केलं आहे. 1984 मध्ये आलेल्या किम या सिनेमात ते दिसले होते. हा सिनेमा एका कादंबरीवर आधारित आहे. तर 2014 मध्ये आलेल्या ‘खूबसूरत’ या चित्रपटातदेखील ते झळकले होते. या चित्रपटात अभिनेता फवाद खान आणि अभिनेत्री सोनम कपूरने मुख्य भूमिका साकरली होती.