मुंबई, 22 सप्टेंबर : आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सच्या जाहिराती पाहतो. ज्या बॉलिवूड कलाकरांनी केलेल्या असतात. एखादी अभिनेत्री फेअरनेस क्रीमचं प्रमोशन करताना दिसते तर अभिनेता एखाद्या कोल्ड ड्रीकचं प्रमोशन करताना दिसतो. आपण तर जाहिरात पाहतो आणि सोडून देतो. मात्र तुम्हाला माहित आहे का एका जाहिरातीसाठी किती मानधन घेतात. जर ब्रँड एंडोर्समेंटमधून होणाऱ्या कमाईची यादी बनवली तर यात अभिनेता आमिर खान सर्वात वरच्या स्थानावर असेल. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान एका उत्पादनाचं प्रमोशन करण्यासाठी 11 कोटी रुपयांचं मानधन घेतो. तर शाहरुख खान एका जाहिरातीसाठी 9 कोटी एवढी रक्कम घेतो. या रेट लिस्टमध्ये बिग बी अमिताभ बच्चन तिसऱ्या क्रमांकावर आहे. ते एका जाहिरातीसाठी 8 केटी रुपयांचं मानदन घेतात. दैनिक भास्करनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अक्षय कुमार-7 कोटी, सलमान खान-7 कोटी, विक्की कौशल-3 कोटी, टायगर श्रॉफ-2.5 कोटी, राजकुमार राव-1.5कोटी एवढं मानधन घेतात. Dabangg 3 : सलमान खानसोबत सई मांजरेकरचा फर्स्ट लुक आला समोर, Photo Viral
जाहिरात क्षेत्रात सध्या समोर येत असलेल्या नव्या चेहऱ्यांमध्ये विकी कौशल सर्वात टॉपला आहे. याबाबत जाहिरात गुरु प्रल्हाद कक्कर सांगतात, विकी कौशलचा स्वभाव शांत आणि लाजाळू आहे. त्याला कोणत्याही गोष्टीचा अभिमान नाही. एवढं यश मिळवूनही त्याचे पाय जमिनीवर आहेत. यामुळेच की काय सध्या तो इंडस्ट्रीमधील सर्वांचा लाडका चेहरा बनला आहे. रात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती ‘अशी’ कळतेच
खासकरुन उरीनंतर अनेक कंपन्या जाहिरातींसाठी विकीला साइन करताना दिसत आहेत. त्यानं साकारलेल्या भूमिकेला सूट करणाऱ्या सर्व प्रॉडक्ट्सच्या कंपन्या आपल्या जाहिरातींसाठी विकीला साइन करत आहेत. विकीनं एकीकडे एक देशभक्त साकारला तर दुसरीकडे संजू मधली कॉमेडी सुद्धा आहे. VIDEO : सलमान खान अजूनही कतरिनावर फिदा, भर कार्यक्रमात तिचं नाव ऐकलं आणि… ============================================================ VIDEO: ‘लफडी केली तर सहन करा’; राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी