मुंबई,25 जून- ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karate) ही छोट्या पडद्यावरील एक अतिशय लोकप्रिय मालिका आहे.मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत असतात. त्यामुळेच प्रेक्षक दररोज मालिका पाहण्यासाठी उत्सुक असतात.सध्या मालिकेत असाच एक रंजक ट्रॅक पाहायला मिळणार आहे. पाहूया मालिकेत नेमकं काय घडणार. स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच पकड निर्माण केली आहे. मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात आणि कुटुंबात सतत काही ना काही ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात. सुरुवातीला साधीभोळी असणारी अरुंधती आता मालिकेत स्वतःच्या पायावर उभी झाली आहे. सध्या ती मोठ्या आत्मविश्वासाने प्रत्येक निर्णय घेत आहे. ती प्रत्येक संकटाला धाडसाने सामोरं जात आहे. तर दुसरीकडे आता अनिरुद्धला आपल्या एक्स पत्नी अरुंधतीबाबत एक ओढ निर्माण होत आहे. तर दुसरी पत्नी संजनाची दुष्ट वृत्ती त्याच्या समोर येत आहे. त्यामुळे मालिकेत चांगलाच रंजक ट्रॅक सुरु आहे.
**(हे वाचा:** ‘माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस’; सिद्धार्थ जाधवची ‘ती’ पोस्ट नेमकी कशाबाबत? ) सध्या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.कारण यामध्ये अनिरुद्ध चक्क संजनावर आरोप लावताना दिसून येत आहे. वास्तविक मालिकेत अनघाचा अपघात झाला आहे. ती जिन्यावरून उतरताना संजनाचा धक्का लागून खाली पडते. त्याचवेळी संजनासुद्धा तिथेच असते. त्यामुळे अनिरुद्धने संजनावर असा आरोप केला आहे की तिने अनघाला मुद्दाम धक्का दिला आहे. अनिरुद्धचं ए बोलणं ऐकून सर्वच थक्क झाले आहेत. हा महाएपिसोड उद्या अर्थातच रविवारी 26 जूनला रात्री 8 वाजता प्रेक्षेपित होणार आहे.