JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Aai Kuthe Kay Karte: थाटात पार पडला ईशा-अनिशचा साखरपुडा; भाव खाऊन गेला अरुंधती-आशुतोषचा क्लासी लूक

Aai Kuthe Kay Karte: थाटात पार पडला ईशा-अनिशचा साखरपुडा; भाव खाऊन गेला अरुंधती-आशुतोषचा क्लासी लूक

Aai Kuthe Kay Karte Latest Update: ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या अरुंधतीची लाडकी लेक ईशाच्या लग्नाचा घाट घालण्यात आला आहे.ईशा आणि अनिश लवकरच लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत.

जाहिरात

'आई कुठे काय करते'मध्ये थाटात पार पडला ईशा-अनिशचा साखरपुडा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 मे- ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या अरुंधतीची लाडकी लेक ईशाच्या लग्नाचा घाट घालण्यात आला आहे.ईशा आणि अनिश लवकरच लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. तत्पूर्वी मालिकेत या दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे. ईशाला आपल्या लग्नाचे प्रत्येक कार्यक्रम थाटमाट पार पडायला हवे आहेत. त्यामुळेच ईशा आणि अनिशचा साखरपुडासुद्धा मोठ्या धामधूममध्ये होणार आहे. या दोघांच्या साखरपुड्याचे काही व्हिडीओ सेटवरुन समोर आले आहेत. मालिकेत जरी अजून साखरपुडा दाखवण्यात आलेला नसला तरी साखरपुड्याचा एपिसोड शूट करण्यात आला आहे. यामध्ये सर्वांचा लुकदेखील उघड झाला आहे. स्टार प्रवाहावरील ‘आई कुठे काय करते’ ही अतिशय लोकप्रिय मालिका ठरली आहे. मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी पकड निर्माण केली आहे. त्यामुळेच मालिका टीआरपीच्या शर्यतीत इतर मालिकांना मागे टाकत टॉप 2 मध्ये दिसून येते. या मालिकेत सतत काही ना काही रंजक घडामोडी घडून येतात. त्यामुळे प्रेक्षकही मालिकेच्या प्रत्येक भागासाठी उत्सुक असतात. (हे वाचा: Aai Kuthe Kay Karte मध्ये होणार लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री;आशुतोषसोबत असणार खास नातं ) या मालिकेत काही दिवसांपूर्वी अरुंधती आणि आशुतोषचं लग्न पार पडलं होतं. या लग्नाचे एपिसोड प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. दरम्यान आता मालिकेत अरुंधतीची मुलगी ईशा आणि अनिशच्या लग्नाची धामधूम सुरु झाली आहे.त्यादरम्यान या दोघांचा साखरपुडासुद्धा उरकण्यात आला आहे. साखरपुड्यामध्ये फक्त ईशा आणि अनिशचं नव्हे तर अरुंधती आणि आशुतोषसुद्धा फारच सुंदर दिसत आहेत. अल्ट्रा मराठी बझने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

ईशाने आपल्या साखरपुड्यासाठी सुंदर असा लेहंगा परिधान केला आहे. लाल आणि हिरव्या रंगाच्या या लेहंग्यामध्ये ईशा फारच सुंदर दिसत आहे. तर अनिशने पारंपरिक असा शेरवानी परिधान केला आहे. या दोघांचा लूक सध्या चांगलाच पसंत केला जात आहे.अल्ट्रा मराठी बझने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दुसरीकडे लेकीच्या साखरपुड्यात अरुंधती आणि आशुतोष मात्र भाव खाऊन गेले आहेत. होणाऱ्या नवरा-नवरीपेक्षा जास्त या दोघांच्या लूकची चर्चा होत आहे. ईशाच्या साखरपुड्यासाठी अरुंधतीने सुंदर अशी पिवळ्या रंगाची पारंपरिक साडी परिधान केली आहे. डोक्यात गुलाबाचं फुलदेखील लावलं आहे. शिवाय पारंपरिक दागिन्यांनी आईचं सौंदर्य आणखीनच खुललं आहे. तर आशुतोषने मोती कलरची शेरवानी परिधान केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या