JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तुमच्या आशीर्वादाने नवीन प्रवास सुरु करते..' रुपाली भोसलेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

'तुमच्या आशीर्वादाने नवीन प्रवास सुरु करते..' रुपाली भोसलेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

रूपाली भोसले लवकरच एका नवीन प्रवासाला सुरूवात करणार आहे, याबद्दल नुकतीच तिनं एक पोस्ट केली आहे.

जाहिरात

रुपाली भोसलेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जुलै- आई कुठे काय करते मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे. मालिकेचे कथानक अरुंधती भोवती फिरताना दिसते. मालिकेत संजना ही नकारात्मक भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले साकारते. रूपाली भोसलेचा देखील एक वेगळा चाहता वर्ग आहे. संजना आता बदलली आहे,तिच्यातील हा बदल प्रेक्षकांना देखील आवडू लागला आहे. आता संजना फेम रूपाली भोसलेनं नुकतीच एक पोस्ट केली आहे, ज्यामुळं ती चर्चेत आली आहे. रूपाली भोसले सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळे नेहमीच ती लक्ष वेधून घेत असते. रूपाली भोसले लवकरच एका नवीन प्रवासाला सुरूवात करणार आहे, याबद्दल नुकतीच तिनं एक पोस्ट केली आहे. नेमका हा प्रवास कसला आहे, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. शिवाय यामुळे ती आई कुठे काय करते मालिका सोडणार का, अशी चिंता देखील तिच्या चाहत्यांना सतावू लागली आहे. वाचा- ‘भारतीय सिनेमात फक्त हीप्स आणि बुब्स…’ प्रियांकाने उडवली बॉलिवूडची खिल्ली नेमकी रूपाली भोसलेची पोस्ट काय आहे ? रूपाली भोसलेनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की,ग्रेट BHET सुरेश वाडकरजी आणि पद्मा वाडकरजी.. तुमचे आशीर्वाद घेउन पुढच्या प्रवासाला निघाले आणि मला खत्री अहे हा प्रवास खूप सुखकर होणार, आम्ही आजही एन्जॉय करत असलेली इतकी अप्रतिम गाणी दिल्याबद्दल धन्यवाद..

तुम्हा दोघांना भेटून आनंद झाला, अशी पोस्ट रुपाली भोसलेने केली आहे. रुपालीची ही पोस्ट पाहून रुपाली आई कुठे काय करते मालिका सोडणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मागच्या काही दिवसांपासून रूपाली भोसले ग्रेट भेट म्हणत उर्मिला मातोंडकर, सुनील शेट्टी यांच्यासोबत फोटो शेअर करत आहे. रूपालीचा हा कोणता नवीन प्रोजेक्ट आहे का..याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

संबंधित बातम्या

पूर्वीची संजना आणि आताची संजना यात खूपच बदल झाला आहे. संजना आता देशमुखांची सून म्हणून चांगलं वागताना दिसतेय. शिवाय एक माणूस म्हणून ती चांगली वागतेय हे प्रेक्षकांना कुठेतरी आवडतंय. तिच्यात झालेला बदल खरचं कौतुकास्पद आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या