JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / माय लेकीची जमली बालकवितेची मैफिल,अरुंधतीचं मुलीसोबत पाहायला मिळालं क्यूटवालं बॉन्डिंग

माय लेकीची जमली बालकवितेची मैफिल,अरुंधतीचं मुलीसोबत पाहायला मिळालं क्यूटवालं बॉन्डिंग

मधुराणी बऱ्याचवेळा स्वरालीचे व्हिडिओ नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते. तिच्या प्रत्येक व्हिडिओतून माय लेकीच खास बॉन्डिंग आधोरेखित होत असतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 फेब्रुवारी- ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. कविता वाचन असले किंवा तिच्या लेकीसोबतचे मस्तीचे व्हिडिओ ती अधूनमधून सोशल मीडियार शेअर करत असते. तिच्या प्रत्येक व्हिडिओतून माय लेकीच खास बॉन्डिंग आधोरेखित होत असतं. आज देखील मधुराणीनं आपल्या लाडक्या लेकीसोबत एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. आजपर्यंत तुम्ही मधुराणीला कविता सादर करताना पाहिलं असले. आता तिची लेक देखील कविता सादर करत आहे. आई पाठोपाठ आता लेक देखील कविता वाचनाचा पाठ गिरवताना दिसत आहे. मधुराणीनं नुकताच लेकीसोबता क्यूटवाला एक व्हिडिओ सोशल मीडियार शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटचा पाऊस पडताना दिसत आहे. मधुराणीनं लेकीसोबत कविता सादरीकरणाचा व्हिडिओ इन्स्टाला सादर करत म्हटलं आहे की, तिशय सुंदर अशी विंदा करंदीकर ह्यांची कविता.म्हणायला बालकविता , पण मोठ्यांनाच सहभावना शिकवून जाते ही…! या दोघीचं कविता सादरीकरण पाहून चाहते देखील या दोघींच्या प्रेमात पडले आहेत. मधुराणी बऱ्याचवेळा स्वरालीचे व्हिडिओ नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते. विशेष म्हणजे या व्हिडिओमधून मायलेकींचं प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे. नेटकऱ्यांना देखील त्यांचा हाच प्रेमळ अंदाज भावला आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेली मधुराणी अनेकदा तिच्या लेकीसोबतचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यापूर्वी देखील तिने तिच्या मुलीसोबत गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये या दोघींची गाण्याची जुगलबंदी पाहायला मिळाली होती.

संबंधित बातम्या

मधुराणी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती उत्तम कवित सादर करते हे चाहत्यांना माहित असेलच. ती अनेकवेळा तिच्या कविता सदीकरणाच्या कार्यक्रमाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्य़ांनसोबत शेअर करत असते. शिवाय ती उत्तम गाते देखील, तिला गायनाची देखील आवड आहे. म्हणून तिनं तिच्या मुलीचं नाव स्वराली ठेवलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या