JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'वाहवा....टाळ्या, हशा आणि डोळ्यातलं पाणीसुद्धा' इंदौरकरांच्या प्रेमानं भारावून गेली मधुराणी प्रभुलकर

'वाहवा....टाळ्या, हशा आणि डोळ्यातलं पाणीसुद्धा' इंदौरकरांच्या प्रेमानं भारावून गेली मधुराणी प्रभुलकर

काही दिवसापूर्वी मधुराणी प्रभुलकरनं इन्स्टावर एक तिचा प्रवासतील फोटो शेअर करत म्हटलं होतं की, इंदौर वारी…‘कवितेचं पान ‘. कवितांचा कार्यक्रम…..सविस्तर नंतर लिहिते. शुभेच्छा असू द्या. आता तिच्या या प्रवासाबद्दल तिनं सविस्तर लिहिलं आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 मे- आई कुठे काय करते**( Aai kuthe kay karte )** मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित ही मालिका असून अरुंधती या पात्राभोवती मालिकेचं संपूर्ण कथानक फिरताना दिसतं. या मालिकेतील अरुंधतील ही भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर (Madhurani gokhale prabhulkar ) साकारत असून तिच्या अभिनयामुळे अनेकांची मनं जिकंली आहेत. या मालिकेमुळे मधुराणीला एक वेगळी ओळख मिळाली. मधुराणी हे नाव महाराष्ट्राच्या घराघारत पोहचलं. मधुराणी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते. मधुराणी प्रभुलकरची कविता वाचनाची आवड कुणापासून लपलेली नाही. अनेकादा सोशल मीडियावर यासंबंधी व्हिडिओ शेअर करत असते. नुकतीच मधुराणीनं याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. काही दिवसापूर्वी मधुराणी प्रभुलकरनं इन्स्टावर एक तिचा प्रवासतील फोटो शेअर करत म्हटलं होतं की, इंदौर वारी…‘कवितेचं पान ‘. कवितांचा कार्यक्रम…..सविस्तर नंतर लिहिते. शुभेच्छा असू द्या. आता तिच्या या प्रवासाबद्दल तिनं सविस्तर लिहिलं आहे. तिनं तिच्या इंदौर वारीबद्दल लिहिलं आहे. तिनं काही वर्तमानपत्रातील तिच्या इंदौर वारीचे फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, इंदौर… कवितेचं पान….मराठी समाज, इंदौर. इंदौर च्या मराठी मंडळींच्या रसिकतेविषयी मी बरंच ऐकून होते…,मागे शर्वरी बरोबर गेले होते तेव्हा अनुभव घेतला होता. वाचा- ‘आता कोणत्या दगडाला शेंदूर फासणार?’ या प्रश्नामुळं ‘Tamasha Live’चा टीझर चर्चेत! पण तरी दीड पावणेदोन तास केवळ शब्दांवर आपण रसिकांना खिळवून ठेऊ शकू का अशी धाकधूक होती…असा कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम तिथे फार कुणी केला नव्हता.पण कार्यक्रम सुरू झाला तसतशी रंगत चढत गेली… इंदौरकर काय सुंदर ऐकत होते…योग्य ठिकाणी वाहवा….टाळ्या,हशा आणि डोळ्यातलं पाणीसुद्धा. वाचा- ‘आता कोणत्या दगडाला शेंदूर फासणार?’ या प्रश्नामुळं ‘Tamasha Live’चा टीझर चर्चेत! कार्यक्रमातील शेवटची कविता सादर केली ..ती सलग 12 मिनिटांची आहे….ती संपली आणि कार्यक्रम संपला असं दर्शवायला मी नमस्कार केला…तर प्रेक्षक स्तब्ध…कुणी टाळ्या वाजवेनात …जागचे हलेनात… मी पूर्ण गोंधळून गेले …काही क्षण थंबले आणि पुन्हा नमस्कार करत धन्यवाद म्हणाले… मग प्रेक्षक टाळ्या वाजवू लागले….पण कुणी जागच हलेना …उठेना… मग मीच विचारलं काय झालं? तर म्हणाले अजून ऐकवा… अजून काहीतरी… मला एकदम भरून आलं मग अजून काही कविता एक गाणं ऐकवलं तेव्हा त्यांचं समाधान झालं…इतका सुंदर रसिक समोर असेल तर कार्यक्रमाचा वेगळा आनंद आणि समाधान मिळतं… " तुम्ही परत या….आम्हाला अजून कविता ऐकवायला" असं येऊन येऊन प्रत्येकाने सांगितलं आणि कवितेचं पान च्या संपूर्ण प्रवासाचं सार्थक झालं असं वाटलं.

संबंधित बातम्या

मधुराणी प्रभुलकर अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम कवयित्री आणि गायिका व संगीतकार सुद्धा आहे. आहे. अनेकदा ती तिच्या कविता तिच्या आवाजात सोशल मीडियावर शेअर करत असते. मधुराणीला संगीतकार म्हणून सुंदर माझं घर चित्रपटात पहिला मोठा ब्रेक मिळाला. ज्यासाठी साधना सरगम आणि श्रेया घोषाल यासारख्या अव्वल गायिका यात सहभागी झाल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या