JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अरुंधती मालिकेतून गायब! हॉटेल बुकींग अन् हजारोंचा गंडा; मिस्टर प्रभुलकरांबरोबर नेमकं काय घडलं?

अरुंधती मालिकेतून गायब! हॉटेल बुकींग अन् हजारोंचा गंडा; मिस्टर प्रभुलकरांबरोबर नेमकं काय घडलं?

आई कुठे काय करते फेम मधुराणी प्रभुलकरच्या नवऱ्याची ऑनलाइन फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. नेमकं काय घडलंय जाणून घ्या.

जाहिरात

प्रमोद प्रभुलकर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 27 ऑक्टोबर : स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या मालिकेतून गायब आहे. तिच्या कुटुंबाबरोबर दिवाळी निमित्त कोकणात सुट्ट्यांचा आनंद घेत असताना अभिनेत्रीच्या बाबतीत ऑनलाईन माध्यमातून फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. मधुराणीचा नवरा दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांची ऑनलाईन पद्धतीनं 17 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं आहे. नेमकं काय झालंय जाणून घ्या. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचा नवरा दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांनी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं हॉटेल बुकींग केलं होतं. गणपतीपुळेतील ग्रीनलीफ रिसॉर्टमध्येमध्ये त्यांनी 2 दिवसांसाठी 17 हजार रुपये देऊन बुकिंग केलं होतं. परंतू त्यांनी दिलेले पैसे हे भलत्याच अकाऊंटला ट्रान्सफर झाले. हॉटेल व्यावसायिकांकडून ग्राहकांची फसवणूक केल्याचं प्रमोद प्रभुलकर यांनी म्हटलं होतं. मात्र हॉटेलची वेब  साइट हॅक झाल्यानं हा प्रकार घडल्याचं सांगण्यात आलं आहे.

या प्रकारावर प्रमोद प्रभुलकर यांनी म्हटलं आहे की, “आम्ही गुगलवरून जी माहिती मिळाली त्यानुसार आम्ही ऑनलाइन बुकींग करून इथे आलो. पण इथे आल्यानंतर आमचं बुकींगच झालंच नव्हतं. आमचे पैसे त्यांच्याकडे आलेच नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. इथे हा प्रकार मागच्या 15 दिवसांपासून सुरू आहे. अन्यायाला वाचा फुटली पाहिजे आणि याला दाद मिळाली पाहिजे”. हेही वाचा - Aai kuthe kay karte: दिवाळीच्या मुहूर्तावर मालिकेत ट्विस्ट; अमेरिकेहून परतताच गौरीने घेतलाय मोठा निर्णय शिवसेनेच्या नेत्यांकडे केली मागणी प्रमोद प्रभुलकर पुढे म्हणाले, “आम्हाला कळलं की हे हॉटेल शिवसेनेचे ठाण्याचे नेते रविंद्र फाटक यांचं आहे.  त्यांच्याशी आम्ही संपर्क केलाय. त्यांनाही हा प्रकार आजचं कळला आहे.  आमचं इतकंच म्हणणं आहे की शिवसेनेचे जवळचे नेते आणि प्रभावशाली नेते आहेत.  रविंद्र फाटक हे आता शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तुमचे चांगले संबंध आहेत.  त्यांना ही कल्पना मागच्या 15 दिवसांपासून का नाहीये ?  जनतेचे पैसे परत कसे मिळतील हे त्यांनी पाहिलं पाहिजे ही आमची मागणी आहे”. तसंच ते पुढे म्हणालेत, “याच हॉटेलमध्ये अनेक ठाणेकरांचे पैसे गेले आहेत हे देखील आम्हाला कळलंय. आम्ही आता त्या हॉटेलमध्ये राहतोय हॉटेलचं सगळं मॅनेजमेंट चांगलं आहे.  हॉटेल व्यावसायिकांनी सायबर क्राइमकडे तक्रार केली आहे.  रविंद्र फाटक यांनी आम्हाला या प्रकरणावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे. आता या प्रकरणात काय घडतंय हे आपण पाहूयात”.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या